Friday, September 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षलवाद्याच्या जीवनावर आधारीत 'अरण्य' मराठी चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला..

नक्षलवाद्याच्या जीवनावर आधारीत ‘अरण्य’ मराठी चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- ‘अरण्य’ नामक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.चित्रपट एका नक्षलवाद्याच्या जीवनावर आधारीत असून मुलीशी असलेल्या नात्याचा आणि हिंसेच्या मार्गाऐवजी शिक्षण व शांततेचा स्वीकार करणाऱ्या प्रवासाची  कहाणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच ‘अरण्य’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.लेखक-दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक वास्तव आणि मानवी भावनिक नाते उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.येत्या १९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरचे अनावरण करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सिनेमात परिवर्तनाची कथा सांगण्याची ताकद आहे. ‘अरण्य’ हा अशा लोकांचा प्रवास दाखवतो, ज्यांनी हिंसेऐवजी शिक्षण आणि शांततेचा मार्ग स्वीकारला.हा चित्रपट प्रेक्षकांवर नक्कीच प्रभाव टाकेल,असा मला विश्वास आहे.यांची ‘एक तिकीट, एक वृक्ष’ लावायची ही संकल्पना मला विशेष भावली.” एस.एस. स्टुडिओ आणि एक्सपो प्रेसेंट या बॅनरखाली शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत हृतीका पाटील,वीणा जगताप, विजय निकम,सुरेश विश्वकर्मा,अमोल खापरे आणि चेतन चावडा यांच्या भूमिका असतील. चित्रपटातील संगीत हे आदिवासी लोककलेवर आधारित असून प्रेक्षकांना एक वेगळा आणि अस्सल अनुभव मिळणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!