Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोली"बरेच काही करतो आहे आणि आणखी खूप काही करायचे आहे"- मुख्यमंत्री देवेंद्र...

“बरेच काही करतो आहे आणि आणखी खूप काही करायचे आहे”- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली जिल्ह्याचा ४३ वा वर्धापनदिन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-बरेच काही करतो आहे आणि आणखी खूप काही करायचे आहे.हा आमच्यासाठी राज्यातील शेवटचा नाही,तर पहिला जिल्हा आहे.गडचिरोलीला विकासातील अग्रणी जिल्हा बनवू,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
गडचिरोली जिल्हा निर्मितीला आज,मंगळवार २६ ऑगस्ट रोजी ४३ वर्ष पूर्ण होत आहेत,त्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.हा जिल्हा गेली अनेक दशके विकासापासून वंचित राहिला.पण,२०१४ पासून आम्ही त्याला विकासाच्या केंद्रस्थानी आणले.गडचिरोलीला माओवादापासून मुक्त करणे आणि तो उद्योग,शिक्षण, रोजगार,पायाभूत सुविधायुक्त करणे, याला आमचे सर्वोच्च प्राधान्य राहिले.आज अर्धा गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त झाला.केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत संपूर्ण देश माओवादमुक्त करण्याचा जो निर्धार केला आहे,त्यादिशेने आम्ही काम करतो आहोत,असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आमचे गडचिरोलीचे पोलिस,सी-६० जवानांसह यात मोठा वाटा देत आहेत.पोलिस दादालोरा खिडकीसारख्या उपक्रमांनी पोलिस या विकास प्रक्रियेतील अग्रदूत बनले आहेत.गडचिरोलीला देशातील पोलाद सिटी बनविण्याच्या दिशेने आम्ही अतिशय गतीने पाऊले टाकली आहेत.सुमारे १ लाख कोटींची गुंतवणूक ही गडचिरोली जिल्ह्यात येत आहे.हे करीत असतांना गडचिरोलीचे जल,जमीन,जंगल आणि पर्यावरण राखण्यावर आमचा तितकाच भर आहे.मेडिकल कॉलेज असो,विमानतळ असो, रेल्वेमार्ग असो,रस्त्यांची कामे असो,शिक्षणाच्या सुविधा अशा सर्वच दिशांनी आज गडचिरोली जिल्हा भक्कम प्रगती करतो आहे.अर्थात यात गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचीही तितकीच भक्कम साथ लाभते आहे आणि त्यांच्यामुळेच ही विकास प्रक्रिया गतिमान झाली आहे.सर्व जिल्हावासियांना गडचिरोली जिल्हा स्थापनादिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा,असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!