Monday, August 31, 2026
Homeगोंदियाकालच पत्रक अन् आजच समर्पण.. गोंदिया पोलिसांपुढे ११ नक्षलवाद्यांची शरणागती..

कालच पत्रक अन् आजच समर्पण.. गोंदिया पोलिसांपुढे ११ नक्षलवाद्यांची शरणागती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-कुख्यात नक्षली माडवी हिडमाचा चकमकीत खात्मा होताच नक्षली संघटना पार भेदरून गेली आहे. सततच्या नक्षलविरोधी कारवायांमुळे नक्षलवाद्यांचा एकमेकांशी संपर्क तुटून कोण कुठे पळाला आणि कोण कुठे लपलाय,हे कळेनासे झाले आहे.त्यामुळेच महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड(एमएमसी)विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता अनंत याने २४ नोव्हेंबरला आत्मसमर्पणाची तयारी दर्शवत १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत मागितली होती. यानंतर छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी सरकारकडे अधिक वेळ नाही,माओवाद्यांनी विना विलंब शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करावे,असे स्पष्ट केले होते. त्यानुसार,काल,गुरुवार २७ नोव्हेंबरला नक्षलवाद्यांनी नवे पत्रक जारी करून १ जानेवारी २०२५ रोजी सर्वजण शस्त्रत्याग करून मुख्य प्रवाहात येऊ,असे जाहीर केले होते.अश्यातच १ जानेवारीपर्यंत आत्मसमर्पणाची तयारी दर्शविणाऱ्या अनंतने मुदतीपूर्वीच शस्त्र ठेवीत दरेकसा दलमच्या ११ नलक्षवाद्यांसह गोंदिया पोलिसांपुढे आज, शुक्रवार २८ नोव्हेंबरला सायंकाळच्या सुमारास आत्मसमर्पण केले.याला गोंदियाचे पोलिस पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी दुजोरा दिला असून यासंदर्भातील संपूर्ण माहिती उद्या शनिवारी स्पष्ट केली जाणार असल्याचे म्हटले आहे.विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता अनंत याने पहिला पत्रक २४ नोव्हेंबरला जारी करून १५ फेब्रुवारी रोजी आत्मसमर्पणाची तयारी दर्शविली होती.त्यानंतर,दुसरा पत्रक २७ नोव्हेंबरला जारी केला,त्यात १ जानेवारीला आत्मसमर्पण करणार असल्याचे म्हटले आणि लगेच आज २८ नोव्हेंबरला सरेंडर झाल्याने नक्षल चळवळ आता कमकुवत झाल्याचे दिसून येते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!