Friday, June 19, 2026
Homeनागपूरकायद्याच्या समोर कुणीही मोठा नाही.. चक्क जिल्हाधिकारी हाजिर हो म्हणीत कोर्टाने बजावले...

कायद्याच्या समोर कुणीही मोठा नाही.. चक्क जिल्हाधिकारी हाजिर हो म्हणीत कोर्टाने बजावले समन्स..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कायद्याच्या समोर कुणीही मोठा नसल्याचा हल्ली प्रकार उघडकीस आला असून भूसंपादनाच्या भरपाईवर समाधानकारक उत्तर न दिल्याने चक्क चंद्रपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी विनय गौडा यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समन्स बजावून उद्या बुधवारी २२ जानेवारीला ऑनलाइन पद्धतीने न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
अधिक माहिती अशी की,तत्कालीन चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी २१ जुलै २०११ रोजी अधिसूचना जारी करून गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाकरिता ब्रम्हपुरी तालुक्यातील सूरबोडी येथील शेतजमीन संपादित केली.त्यानंतर ५ जुलै २०१३ रोजी या शेतजमिनीच्या भरपाईचा अवॉर्ड जारी करण्यात आला.परंतु,२०२४ पर्यंत वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात भरपाईची रक्कमच जमा करण्यात आली नाही.त्यामुळे ताराचंद बावनकुळे व इतर सात पीडित शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.दरम्यान,या शेतकऱ्यांना केवळ भरपाईची रक्कम देण्यात आली.त्या रकमेवर २०१३ पासूनचे व्याज देण्यात आले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांच्या वकील ॲड.शिल्पा गिरटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीवर आक्षेप नोंदविला.पीडित शेतकरी २०१३ पासून भरपाईची प्रतीक्षा करीत होते.यासंदर्भात त्यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांसोबत वारंवार पत्रव्यवहारही केला. परंतु,त्यांचे कोणीच ऐकले नाही आणि न्यायालयात धाव घेतल्यानंतरही त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रकार सुरूच आहे; त्यामुळे शेतकऱ्यांचा वाली कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.इतर अधिकारी,कर्मचारी यांचेसह जिल्हाधिकारी तितकेच जबाबदार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने प्रकरणी काय पाऊले उचलली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!