Wednesday, July 29, 2026
Homeदेसाईगंजऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला 'दे धक्का'.. - आजच...

ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘दे धक्का’.. – आजच पक्ष प्रवेश अन् आजच नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही घोषित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वप्रथम नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी यासाठी मतदान होणार आहे; तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होऊन नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या उमेदवारांची प्रतिष्ठा उघड होणार आहे. त्यातच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस उरलेले असतांनाच देसाईगंज नगर परिषद क्षेत्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे,आजच पक्ष प्रवेश अन् आजच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घोषित करण्यात आल्याने सर्वजण अवाक् झाले आहेत.
देसाईगंज नगराध्यक्षपदी ओबीसी महिला यांची वर्णी लागणार आहे.अश्यातच आज,शुक्रवार ७ नोव्हेंबरला
सामाजिक कार्यकर्त्या निता संजय गुरु,देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी तसेच जेष्ठ अधिवक्ता संजय गुरु यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रफुल पटेल,इंद्रनील मनोहरराव नाईक,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,सुनील तटकरे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला.यावेळी अजित पवार गटाकडून देसाईगंज नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचीही घोषणा करण्यात आली.यात सामाजिक कार्यकर्त्या निता संजय गुरु यांना देसाईगंज नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घोषित करण्यात आली.यामुळे ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी आणि जेष्ठ अधिवक्ता संजय गुरु हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत तसेच ज्येष्ठ नेते आहेत.त्यांनी काँग्रेस पक्षात राहून संपूर्ण उन्हाळे-पावसाळे अनुभवले आहेत.अश्यातच ऐन देसाईगंज नगर परिषद निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे तीन दिवस उरलेले असतांनाच काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एंट्री केल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!