Tuesday, July 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तएका ठिकाणी पती-पत्नीने; तर दुसऱ्या ठिकाणी टॉप टेन नक्षलवाद्यांनी सोडली लाल दहशत..

एका ठिकाणी पती-पत्नीने; तर दुसऱ्या ठिकाणी टॉप टेन नक्षलवाद्यांनी सोडली लाल दहशत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-दुर्गम भागात बऱ्याच कालावधीपासून लाल दहशतीचे सावट पसरले होते.यामुळे तेथील विकास कोसोदुर राहिला आणि अजूनही काही ठिकाणी जैसे-थे अवस्था पहावयास मिळत आहे.मात्र,आता हळूहळू चित्र बदलू लागले आहेत.ज्या ठिकाणी अट्टल लाल दहशत पसरली होती; अश्या ठिकाणची मुळे आता उपटली जाऊन अनेक जणांकडून हातात संविधान घेतले जात आहे.अश्याच प्रकारे छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील नक्षली दाम्पत्य दिर्दो विज्जल उर्फ जयलाल आणि पत्नी माडवी गंगी उर्फ विमला यांनी आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात शरणागती पत्करली.दोघांवर ३३ लाखांचे बक्षीस होते. दक्षिण उप-क्षेत्रीय समितीचे सदस्य असलेल्या या जोडप्यामुळे नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.तर दुसऱ्या ठिकाणी मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात ७७ लाखांचे बक्षीस आणि तीन राज्यांचा मोस्ट वाँटेड असलेला कबीर याच्यासह १० नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले.शनिवारी मध्यरात्री फॉरेस्ट गार्डच्या मदतीने हे नक्षलवादी आयजी कार्यालयात हजर झाले,तर काल रविवारी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत त्यांनी शस्त्रास्त्रे खाली ठेवत हातात संविधान स्वीकारून शांतीचा व अहिंसेचा मार्ग स्विकारला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!