Friday, June 19, 2026
Homeनवी दिल्लीउच्च न्यायालयाचे जज म्हणतात नोटा भरलेले ५ पोते माझे नाहीत..!

उच्च न्यायालयाचे जज म्हणतात नोटा भरलेले ५ पोते माझे नाहीत..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :-दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश(जज)यशवंत वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरातील जळालेल्या नोटांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.सुप्रीम कोर्टाने या संदर्भात काल शनिवारी रात्री उशिरा मोठे पाऊल उचलले आहे. व्हिडिओमध्ये नोटांनी भरलेले चार ते पाच पोते दिसत आहेत. सदरची घटना १४ मार्च रोजी घडली.बंगल्यात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल पोहोचले.अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना तिथे या नोटा सापडल्या.ही रक्कम सुमारे १५ कोटी रुपये होती.या प्रकरणात, सरन्यायाधीशांनी ३ सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे आणि न्यायमूर्ती वर्मा यांना कोणतेही काम देऊ नये,असे सांगितले आहे.त्यांचा मोबाईल फोन तपासण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.या प्रकरणात, न्यायमूर्ती वर्मा यांनी म्हटले आहे की,घटनेच्या वेळी ते घरात उपस्थित नव्हते आणि त्यांना अडकवले जात आहे.त्या नोटा माझ्या नाहीत.१४ मार्चच्या रात्री न्यायमूर्ती वर्मा यांच्या सरकारी बंगल्याला आग लागली होती.त्यावेळी ते शहराबाहेर होते.न्यायमूर्तीच्या स्वीय सहाय्यकाने अग्नीशमन दलाला बोलावले.यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.मात्र यावेळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना बंगल्याच्या आत नोटांचा मोठा ढीग आढळला.यातील नोटा अर्ध्या जळून राख झाल्या होत्या.हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले.या प्रकरणी कारवाई करत सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी तात्काळ सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची बैठक बोलावली.ज्यामध्ये न्यायमूर्ती वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला.या प्रकरणाची त्यांच्या स्तरावर चौकशी सुरू केली.तसेच यशवंत वर्मा यांच्याकडे सध्या कोणतेही न्यायालयीन काम सोपवू नका,असे आदेशही सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी दिले आहेत.सुप्रीम कोर्टाने न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या खटल्याशी संबंधित कागदपत्रे अपलोड केली आहेत.भारताचे सरन्यायाधीश आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्यातील पत्रव्यवहाराव्यतिरिक्त,त्यात न्यायमूर्ती वर्मा यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पाठवलेल्या उत्तराचाही समावेश आहे.दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातील जळालेल्या नोटांचा पहिला फोटो समोर आला आहे. फोटोंमध्ये जळलेल्या नोटा स्पष्ट दिसत आहेत.दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी एवढी रोकड कुठून आली? याची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने हा व्हिडीओ आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे.

न्यायाधीशांच्या बंगल्यावर नोटांचा खच👇

https://x.com/ssrajputINC/status/1903517649608511804?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1903517649608511804%7Ctwgr%5E48ae509c3b98f4d7dc771d58fcff1cdefed11c88%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fnational%2Fvideo-from-inside-justice-yashwant-verma-house-surfaced-supreme-court-released-it-a-a1001%2F

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!