Thursday, April 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर १ पदवीधर शिक्षक...

आता वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर १ पदवीधर शिक्षक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक प्राथमिक, माध्यमिक तसेच खासगी आस्थापनातील शाळेतील शिक्षकांना दिलासादायक निर्णय शासनाने घेतला आहे.आता वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर १ पदवीधर शिक्षक देण्याचे शासनाने मान्य केले आहे.मात्र,त्या शाळेवर दोन शिक्षक द्यावे,अशी मागणी विविध शिक्षक संघटनाकडून होत आहे.
संचमान्यतेचे निकष बदलून सरकारी शाळांमधील ६ वी ते ८ वीच्या वर्गासाठी २० पटसंख्येच्या आतील वर्गांना अखेर एक पदवीधर शिक्षक मंजूर करण्यासाठी शासनाने होकार दिले आहे.तसे आदेश राज्य शासनाने जारी केले आहे.अनेक शिक्षक संघटनेने हा विषय लावून धरताच शासन खडबडून जागे झाले.६ वी ते ८ वीची पटसंख्या २० पेक्षा कमी असल्यास शिक्षकांचे एकच पद मंजूर करण्याचा आदेश म्हणजे ग्रामीण भागातील शाळा मोडीत काढणारा आहे.त्या निर्णयाविरोधात विविध शिक्षक संघटनांनी आवाज उठवल्यानंतर अखेर राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.मात्र,शिक्षक संघटनानी २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर दोन पदवीधर शिक्षकांची नेमणूक करावे,या मागणीवर ठाम आहेत. १ ते १४ वयोगटातील मुलांना ३ किलोमीटरच्या आत शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.मात्र,शाळांना शिक्षक नाकारून ६ वी ते ८ वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या संख्येने कमी असणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी घरापासून दूरच्या शाळेवर अवलंबून राहावे लागणार होते.नव्या आदेशामुळे कमी पटसंख्येच्या शाळांना एक पदवीधर शिक्षक उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!