Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने मुरूमगाव,पेंढरी आणि रांगी गावांसाठी बस फेऱ्या सुरू...

मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने मुरूमगाव,पेंढरी आणि रांगी गावांसाठी बस फेऱ्या सुरू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अविकसित,अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त,अशी गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे.
अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाची,ही ओळख पुसण्यासाठी जोमाने विकास कामे सुरू केली आहेत. येथील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणून विकासाची फळे चाखण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने कामे करीत आहेत.त्यांच्या प्रयत्नाने धानोरा तालुक्यातील मुरूमगाव,पेंढरी आणि रांगी गावासाठी गावकऱ्यांच्या मागणीनुसार राज्य परिवहन महामंडळाने बस फेऱ्या सुरू केल्या आहेत.या बस फेऱ्यांमुळे संबंधित गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून ही बस त्यांच्यासाठी निश्चितच ‘आनंदाची बस’ ठरली आहे.
या गावातील नागरिकांनी रुग्ण,विद्यार्थी आणि आदिवासी नागरिकांच्या सोयीसाठी बस सुरू करणेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते.या निवेदनाची तातडीने दखल घेत राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागीय नियंत्रक यांना बस सुरू करण्याच्या सूचना दिल्या.त्यानुसार  धानोरा तालुक्यातील मौजा मुरूमगाव,पेंढरी व रांगी गावात तसेच गावच्या परिसरातील मार्गावर बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.त्याचप्रमाणे बस फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत.
राज्य परिवहन गडचिरोली विभागातील धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथे ३ नियतांमार्फत १० फेऱ्या,पेंढरीकरीता ३ नियतांमार्फत ८ फेऱ्या व रांगीकरीता २ नियतांमार्फत ६ फेऱ्या सुरू आहेत. मुरूम गाव येथुन दैनंदिन २८५,पेंढरी येथुन दैनंदिन ३३५ व रांगी येथुन दैनंदिन २४२ प्रवासी प्रवास करतात.बस फेऱ्या सुरू झाल्यामुळे संपूर्ण आदिवासी असलेल्या या गावातील आदिवासी बांधवांची मोठी सोय झाली आहे.त्यांना तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयीन कामासाठी,दवाखान्यासाठी जाणे सोयीचे झाले आहे.ही गावे गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेली असून या गावापासून ९ किलोमीटर अंतरावर छत्तीसगड राज्य आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवून मोठ्या प्रमाणावर उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.मागील काही दिवसांत अती दुर्गम भागात मुख्यमंत्री यांनी स्वतः बसमध्ये प्रवास करून गडचिरोली आता नक्षलग्रस्त नाही,तर विकासाच्या मार्गावर गतीने धावणार असल्याचे स्पष्ट केले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!