Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरई-मेलद्वारे नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी.. - यंत्रणा...

ई-मेलद्वारे नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी.. – यंत्रणा अलर्ट मोडवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्याच्या उपराजधानीत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला यापूर्वी मागील महिन्याच्या २५ आणि २६ जून रोजी  बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.त्यानुसार संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर येत कुणीतरी मस्करी केल्याचे उघड झाले होते.अश्यातच आता परत पुन्हा एकदा आज,मंगळवार २२ जुलै रोजी विमानतळ प्रशासनाला सकाळी ई-मेलद्वारे विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने विमानतळ प्रशासनात एकच खळबळ माजली.अज्ञाताने पाठविलेल्या ई-मेलमध्ये एका सिगारेटच्या बॉक्समध्ये बॉम्ब ठेवला असून,तो कधीही स्फोट होऊ शकतो,अशी माहिती देण्यात आली होती.सदरचा ई-मेल प्राप्त होताच तात्काळ यंत्रणा अलर्ट मोडवर येत सोनेगाव पोलीस स्टेशन, बॉम्ब शोधक-नाशक पथक,औद्योगिक सुरक्षा दल यंत्रणा घटनास्थळी दाखल होत संपूर्ण विमानतळ परिसर पिंजून काढला.बराच वेळ शोध मोहीम राबविल्यानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने विमानतळ प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!