Thursday, August 6, 2026
Homeमुंबईआता विभागीय चौकश्या होणार ऑनलाईन पद्धतीने..

आता विभागीय चौकश्या होणार ऑनलाईन पद्धतीने..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधातील विभागीय चौकशा आता ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.या चौकशीसाठी आवश्यक सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतानाच यात ऑनलाईन पद्धतीने ई-साक्ष नोंदविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
राज्यात विविध कारणास्तव सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर विभागीय चौकशा लावल्या जातात.मात्र,तांत्रिक कारणे पुढे करत त्या लांबविण्याचा प्रयत्न केला जातो.या प्रकरणावर आळा घालत दिलेल्या वेळेत चौकशी पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुनावणी घेणे,व्हिडीओ कॉन्फरन्स सुनावणी घेत आरोप असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची तसेच सरकारी साक्षीदार यांची सरतपासणी व उलट तपासणी ई-साक्षमार्फत नोंदविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने अलीकडेच याबाबतचा शासन निर्णय अर्थात जीआर जारी केला आहे. त्यानुसार अप्पर मुख्य सचिव,प्रधान सचिव,सचिव आणि विभागीय चौकशी अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या विभागीय चौकशीची प्रकरणे ऑनलाईन पद्धतीने चालविण्यास मान्यता देण्यात आली आहे.यात आरोप असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची तसेच सरकारी साक्षीदार ज्या जिल्ह्यात कार्यरत किंवा राहात असतील तिथे अथवा शेजारील जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय,संबंधित प्रशासकीय विभागाच्या अखत्यारीतील कार्यालये,जिल्हा मुख्यालयात उपस्थित राहून साक्ष नोंदवाव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!