Friday, July 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता मोबाईल नेटवर्क नसतांनाही पूर्ण होणार ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रिया..

आता मोबाईल नेटवर्क नसतांनाही पूर्ण होणार ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रिया..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतात कोणत्या पिकांची लागवड केली आहे; याची नोंद घेण्याकरिता शासनाच्या वतीने ई-पीक पाहणी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. पीकपेरा,नुकसान भरपाई व धान विक्री आदीच्या माहितीकरिता व अपडेट राहण्याकरिता ई-पीक पाहणी नोंदणी आवश्यक आहे.मागील काही वर्षापासून शासनाने शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या धान पिकाची नोंदणी करण्यासाठी ‘ई पीक ॲप’ची सोय करून दिली आहे.त्यात शेतकऱ्यांनी केलेल्या धान पिकाची नोंद करण्याची सोय आहे.प्रत्यक्षात शेतावर जाऊन शेतकऱ्यांना नोंद घेऊन व फोटो घेऊन त्याची माहिती ॲपवर टाकावयाची असते.मात्र,सदरचा ॲप वापरत असतांना तांत्रिक तसेच मोबाईल नेटवर्क किंवा सर्व्हरच्या अडचणींमुळे ई-पीक  पाहणी नोंदणी प्रक्रिया रखडून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडत असतात.यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील ई-पीक नोंदणी प्रक्रियेत नेटवर्क किंवा सर्व्हरच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून ऑफलाइन फोटो नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नेटवर्क नसतांनाही आपल्या शेतातील पिकाचा फोटो काढून ठेवला तर नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर तो आपोआप प्रणालीवर अपलोड होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.अर्थसंकल्पीय अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात आमदार अनिल पाटील यांनी राज्यातील पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत प्रश्न उपस्थित केला होता.प्रसंगी महसूल मंत्री बावनकुळे यांनी ई-पीक पेरा नोंदणीसाठी आता डीसीएस(DCS)प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना नेटवर्क उपलब्ध नसतांनाही शेतातील पिकाचा फोटो मोबाईलवर घेता येतो.नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर तो फोटो आपोआप प्रणालीवर अपलोड होतो.त्यामुळे नेटवर्क नसल्यामुळे नोंदणी थांबण्याची समस्या कमी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.या निर्णयामुळे ई-पीक पाहणी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना एकप्रकारे मोठा दिलासा मिळाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!