Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोली'त्या' दहा विद्यार्थ्यांची प्रकृती गोळ्यांच्या सेवनामुळे नसून बदलत्या वातावरणामुळे.. -अफवांवर विश्वास ठेवू...

‘त्या’ दहा विद्यार्थ्यांची प्रकृती गोळ्यांच्या सेवनामुळे नसून बदलत्या वातावरणामुळे.. -अफवांवर विश्वास ठेवू नका; आरोग्य प्रशासनाचा खुलासा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मौजा- मुरखळा माल आणि लखमापूर बोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व लोकमान्य टिळक उच्च माध्यमिक शाळेतील काही विद्यार्थ्यांना ‘आयडीए'(IDA) मोहिमेअंतर्गत गोळ्या दिल्यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याची चर्चा सुरू होती.या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत सखोल चौकशी करण्यात आली असून,विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
मुरखळा माल येथील जिल्हा परिषद शाळेतील १८० पैकी १७८ विद्यार्थी आणि ७ शिक्षकांना,तर लोकमान्य टिळक शाळेतील ३७ विद्यार्थ्यांना या मोहिमेअंतर्गत गोळ्या देण्यात आल्या होत्या.गोळ्या खाऊ घातल्यानंतर २४ तासांच्या आत कोणत्याही प्रकारची गुंतागुंत आढळून आली नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम दुमपट्टीवर यांनी सांगितले आहे.
चौकशीअंती असे दिसून आले की,काही विद्यार्थ्यांमध्ये आढळलेले ताप,सर्दी आणि उलट्यांची लक्षणे ही गोळ्यांच्या सेवनामुळे नसून,सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे उद्भवू शकतो.बाधित १० विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांनी गोळ्या घेतल्याच नव्हत्या,उर्वरित १८ ते २६ फेब्रुवारी दरम्यान गोळ्या घेतल्या होत्या व त्यांना 2 मार्च पासून त्रास चालू झाला आहे,सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय चामोर्शी आणि सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचार सुरू आहेत.असे आरोग्य विभागाने खुलासा केला आहे.
त्या गावचे २६ पाणी नमुने  प्रयोगशाळा गडचिरोली येथे तात्काळ तपासणीसाठी पाठवले आहेत.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,वापरण्यात आलेला औषध साठा(Tab Ivermectin, D.E.C.and Albendazole)जिल्हा हिवताप कार्यालय गडचिरोली येथून प्राप्त झाला असून तो प्रमाणित आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र पेदद्ला यांनी पालकांना आवाहन केले आहे की,कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.उर्वरित सर्व विद्यार्थी सुरक्षित असून आरोग्य विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
  • जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे👇
​”मुरखळा माल येथील विद्यार्थ्यांबाबत समोर आलेली लक्षणे ही औषधांच्या दुष्परिणामातून नसून बदलत्या हवामानामुळे झालेली व्हायरल लागण असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.पालकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही.जिल्हा आरोग्य विभाग सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे आणि सर्व औषध साठा पूर्णपणे सुरक्षित आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य मोहिमांना सहकार्य करावे.”
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!