Saturday, August 29, 2026
Homeमुंबईआज होणार अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवट; आरोप-प्रत्यारोपांची मालिका..

आज होणार अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवट; आरोप-प्रत्यारोपांची मालिका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज,बुधवार २५ मार्च २०२६ रोजी शेवटचा दिवस असून मागील महिन्याच्या २३ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला होता.आजच्या अंतिम दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार असून,नाशिकमधील खरात प्रकरण आणि अजित पवारांच्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता असून सभागृहात कामकाजाचा तुफान धडाका पाहायला मिळणार आहे.सभागृहात विविध शासकीय व अशासकीय विषयांवर चर्चा रंगणार असून, सदस्यांकडून लक्षवेधी सूचना मांडल्या जाणार आहेत.त्यामुळे आजचा दिवस राजकीय घडामोडींनी गाजण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे,सदरचे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविनाच पार पडले.काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी देशातील इंधन टंचाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण युद्धाच्या तोंडावर इस्त्रायलच्या दौऱ्यावर जाण्याची काहीच गरज नव्हती.देशाच्या नेतृत्वाच्या चुकीमुळे आज सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. देशात कोरोना महामारीच्या काळासारखी स्थिती उद्धवण्याची शक्यता असून,इंधन तुटवड्यामुळे अनेक समस्या निर्माण होतील,असे ते विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधतांना म्हणालेत.अश्यातच आज शेवटच्या दिवशी अंतिम आठ प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे तब्बल १० सराईत गुन्हेगार तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर येत  नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या...

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!