- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील २९ महानगर पालिकांंच्या निवडणूक प्रचाराला रविवार ४ जानेवारी रोजी सुरुवात झाली.राज्यात तब्बल १५ हजार ९३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून निवडणुकीत राज्यातील विविध महानगरपालिकांंमध्ये तब्बल २ हजार ८६९ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या,गुरुवार १५ जानेवारी रोजी मतदान,तर दुसऱ्याच दिवशी मतदानाचे निकाल घोषित करण्यात येणार आहे.तत्पूर्वी आज, रविवार ११ जानेवारी हा प्रचाराचा ‘सुपर संडे’ असणार आहे.आज रविवारची सुटी असल्याने नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात घरी असणार आहेत.या हक्काच्या मतदारांच्या थेट भेटीगाठी घेण्यासाठी उमेदवार व राजकीय पक्षांनी सकाळपासूनच नियोजन केले असून प्रचारावर पूर्ण ताकद लावली आहे.शहरभर पदयात्रा, रॅली,कॉर्नर मिटिंग,नेत्यांच्या सभांसह घराघरांत संपर्क मोहिमांमुळे निवडणुकीचा माहोल शिगेला पोहोचणार आहे.काल शनिवारी नागपूरचा राजकीय पारा चांगलाच चढला होता.भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)पक्षाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल,एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी,काँग्रेसचे गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी कालच्या रात्री जाहीर सभांमधून प्रचार करीत राजकीय वातावरण तापविले.आज रविवारीही हाच क्रम कायम राहणार आहे.राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज चंद्रपुरात दाखल झाले आहेत.यामुळे पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभांनी रविवार गाजणार आहे. शहराच्या मुख्य चौकांमध्ये शक्तिप्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे.स्टार प्रचारकांचा रोड शो,पदयात्रा होतील. झेंडे,बॅनर, पोस्टरने शहर रंगले आहे.प्रचार वाहनांची वर्दळ वाढली आहे.मतदारांना पटवण्यासाठी उमेदवार शेवटचा प्रयत्न करतील.नेत्यांकडून नाराज गटांना जवळ घेण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे.त्याचबरोबर, मताधिक्य मिळवण्यासाठी रणनीती आखली जात असून येत्या काळात बाजी कुणाची? याची कां त्याची? हे येत्या,शुक्रवार १६ जानेवारी रोजी कळणार आहे.
- Advertisement -

