Thursday, May 28, 2026
Homeनागपूरसावधान..! चोरट्या महिलांची टोळी सक्रिय.. सोन्या-चांदीचे दागिने चमकवून देण्याचा बहाणा; ५ तोळे...

सावधान..! चोरट्या महिलांची टोळी सक्रिय.. सोन्या-चांदीचे दागिने चमकवून देण्याचा बहाणा; ५ तोळे सोन्याचे मंगळसूत्र व १४ तोळे चांदीची पायपट्टी घेऊन पसार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-पूर्वी चोरी करणे वा अनेकांना चुना लावण्यात पुरुष अग्रस्थानी होते.मात्र,काही कालावधीपासून पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या काही स्त्रियांनी विविध क्षेत्रात उंच भरारी घेत आता ‘चुना लावण्यात आम्हीही तुमच्यापेक्षा कमी नाही’ असे विविध घटनांवरून लक्षात येते.अश्याच प्रकारे नागपूर जिल्ह्याच्या नवीन कामठी शहरात अज्ञात चार भामट्या महिलांनी एकाच वस्तीतील तीन महिलांना सोन्या-चांदीचे दागिने आणि तांब्या-पितळेची भांडी घासून देण्याच्या तसेच दुप्पट करून देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.चोरट्या महिल्यांच्या टोळीने जवळपास २ लाख ६७ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास करून पसार झाल्या.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वस्तीतील महिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.प्रकरणी कामठी पोलिसांनी अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हल्ली बाहेर ठिकाणाहून काही महिला गावखेड्यात तसेच शहरी वस्तीत दाखल होऊन वस्तू विक्री,केसाला भांडे वा इतर साहित्त्ये विक्रीसाठी आणत असतात. अश्यातच काही चोरट्या महिला विविध आमिषाला बळी पाडून फुर्र होत होतांना दिसून येतात.अश्याच प्रकारे बुधवारी दुपारच्या सुमारास चार अनोळखी महिला कामठी शहराच्या शिव छत्रपती नगरातील २६ वर्षीय संगीता बळवंत देवांगन यांच्या घरी दाखल झाल्या.त्या महिलांनी संगीता यांना सोन्या-चांदीचे दागिने आणि तांब्या-पितळेची भांडी चमकवून त्यांना दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले.यामुळे संगीता व त्यांची सासू आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने मौल्यवान दागिने या महिलांकडे सोपवले. महिलांनी चलाखीने सर्व दागिने ताब्यात घेतले आणि मुद्देमाल उजळवून आणून देतो,असे सांगून तेथून पसार झाल्या.बराचवेळ वाट पाहूनही त्या परतल्या नाहीत,तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे महिलांच्या लक्षात आले.विशेष म्हणजे,संगीता यांचे ५ तोळे सोन्याचे मंगळसूत्र,अंगठ्या,लॉकेट आणि चांदीची पायपट्टी,तसेच त्यांच्या सासूचे दागिने सोन्याचे लटकन,लॉकेट आणि १४ तोळे चांदीची पायपट्टी आणि शेजारील महिलेचे दागिने व भांडी असा ऐवज लंपास करून फरार झाल्या.बराचवेळ होऊनही चोरट्या महिला परतल्या नसल्याने पोलिसांत तक्रार करण्यात आली. प्रकरणी कामठी पोलिसांनी अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल केला.प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप भिताडे करीत आहेत.घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून अनोळखी व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नका,असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!