Tuesday, July 14, 2026
Homeगोंदियाचिमुकल्याचा जीव घेणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग सज्ज..

चिमुकल्याचा जीव घेणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग सज्ज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव)येथे शुक्रवार ९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घराच्या मागील बाजूस चुलीजवळ बसून असलेल्या चार वर्षीय हियांश शिवशंकर रहांगडाले या चिमुकल्याला दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून उचलून नेले होते.कुटुंबीय व गावकरी मागे धावले असता चिमुकल्याचा काही अंतरावरच मृतदेह आढळून आल्याने कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला होता.त्यातच, घटना घडताच ग्रामस्थ रहांगडाले यांच्या घराजवळ एकत्र गोळा झाले असता,त्याच दिवशी सकाळी साडे दहा वाजेदरम्यान त्यांच्या घरापासून काही अंतरावरील प्रभू कटरे यांच्या घरातील अंगणात बांधलेला बकरा बिबट्याने उचलून नेला होता.घडलेल्या घटनेने ग्रामस्थांनी वन विभागप्रती संताप व्यक्त केला.सदरची बाब लक्षात घेता वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी चार ठिकाणी पिंजरे लावले आहेत.तीन पिंजरे खडकी पहाडी भागात तर एक पिंजरा लेंडीटोला भागात लावण्यात आला असून बंदोबस्तासाठी वनविभागाच्या चमू तैनात करण्यात आल्या आहेत.चार पिंजरे लावूनही पिंजऱ्यांकडे बिबट भटकत नसल्याने बिबट्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी वन विभाग आता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष केंदीत करणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!