Thursday, April 16, 2026
Homeगडचिरोलीआज गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हा कारागृहास भेट.. - कारागृहातील विविध व्यवस्थांची पाहणी

आज गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हा कारागृहास भेट.. – कारागृहातील विविध व्यवस्थांची पाहणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज,शुक्रवार ३० जानेवारी रोजी गडचिरोली जिल्हा खुले कारागृहाला भेट देऊन कारागृहातील विविध व्यवस्थांची सविस्तर पाहणी केली.यावेळी त्यांनी कैद्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या कौशल्य विकासासाठी शेतीव्यतिरिक्त विविध प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी कैद्यांशी संवाद साधत आतापर्यंत कोणती नवी कौशल्ये आत्मसात केली आहेत,कोणते प्रशिक्षण घ्यावेसे वाटते,तसेच विणकाम,वाडीकाम, शेतीपूरक उद्योगांसह इतर कोणती कामे करता येऊ शकतात याबाबत सविस्तर विचारपूस केली.कैद्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी कौशल्य विकासाचे नियोजनबद्ध प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कारागृहातील स्वयंपाकगृहाची पाहणी करतांना कैद्यांना जेवण व नाश्त्यामध्ये दिल्या जाणाऱ्या आहाराबाबत माहिती घेतली.तसेच कारागृहातील औषधसाठा,वैद्यकीय सुविधा,आपत्कालीन परिस्थितीत करण्यात येणारी कार्यवाही याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली.याशिवाय सुरक्षा व्यवस्था,स्वच्छतागृहांची स्वच्छता,पावसाळ्यात पाण्याची गळती होते का,कारागृहातील ग्रंथालय व त्याचा वापर, दीर्घकालीन शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची स्थिती,त्यांना मिळणारी सुट्टी व कुटुंबीयांशी भेटीची व्यवस्था याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली. जिल्हा विकास निधीतून कारागृहासाठी मंजूर करण्यात आलेल्या विविध कामांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.कारागृह अधीक्षक सुभाष सोनवणे यांनी कारागृहातील सुविधा,सुरू असलेली कामे व भावी नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती सादर केली. यावेळी दिवाणी न्यायाधीश(वरिष्ठ स्तर)एस.पी.सदाफळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवडे,कारागृह पोलीस निरीक्षक वैभव आत्राम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिष मेश्राम,उद्योग निरीक्षक पूनम कुसराम यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने...

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!