- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा-मेंढा रेती घाटावर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या अवैध वाळू उपसा प्रकरणी देसाईगंज तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन नामदेव वसाके यांचे सह सत्यवान रामटेके यांनी काल, सोमवार दिनांक-३० डिसेंबर २०२४ पासून सुरू केला असून आज,मंगळवार ३१ डिसेंबरला सकाळच्या सुमारास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचेसह पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी भेट देत पुकारलेल्या आंदोलनाविषयी माहिती जाणून घेत दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे व त्यासाठी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे आमदार मसराम यांनी म्हटले.
आमदार मसराम पुढे म्हणाले की,कोट्यवधी रुपयांच्या अवैध वाळूचा उपसा झाला असल्यानेच आंदोलनाचा पावित्रा या ठिकाणी घेण्यात आला आहे.खरं तर आंदोलन वा उपोषण हे अशावेळी केले जाते की, ज्यावेळी एखाद्याचे सर्व मंत्र हरपून जातात व समोरील व्यक्ती कुणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. त्याचवेळी खरे हत्यार उपसले जाते.त्यामुळे अवैध वाळू उपसा प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असून दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे; अन्यथा कठोरात-कठोर पाऊले उचलली जाणार असल्याचे प्रसंगी आमदार रामदास मसराम यांनी म्हटले.
बेमुदत ठिय्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलनस्थळी आमदार रामदास मसराम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार गट) देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिज उके,देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष राजू बुल्ले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देसाईगंज तालुका उपाध्यक्ष रोशन शेंडे,पदाधिकारी जावेद शेख,नामदेव पिलारे,सागर वाढई,पवन खोब्रागडे व बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisement -

