Sunday, September 13, 2026
Homeगोंदियाअवैध रेतीची वाहतूक अंगलट; रेती भरलेला टिप्पर उलटून चालक ठार..

अवैध रेतीची वाहतूक अंगलट; रेती भरलेला टिप्पर उलटून चालक ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करतांना भरधाव वेगात असलेला टिप्पर उलटून चालक जागीच ठार झाला तर सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना गोंदिया तालुक्याच्या ग्राम इर्री येथील निर्वाण बारसमोर काल, सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.अनमोल महादेव वट्टी वय २५ वर्षे, रा.मेहंदीपूर, ता.तिरोडा असे मृत चालकाचे,तर खुशाल चंदनलाल चौधरी वय १८ वर्षे, रा.मुंडीपार-नवरगाव असे जखमी वाहकाचे नाव आहे.
अवैध रेतीची वाहतूक करतांना वाहतुकीचे साधन कुणालाही सापडू नये,यासाठी टिप्पर वा ट्रॅक्टर भरधाव वेगाने पळविली जातात.वाहन वेगात असतांना नियंत्रित करणे अवघड असते.अश्याच प्रकारे चालक अनमोल वट्टी हा टिप्पर क्रमांक- एमएच ३५ एजे १६१० भरधाव वेगात चालवित होता.त्यातच सकाळच्या सुमारास ग्राम इर्री येथील निर्वाण बारसमोर चालकाला रस्त्यावरील खड्डा दिसला. खड्ड्यातून वाहन जाऊ नये आणि वाहन असंतुलित होऊ नये,यासाठी चालकाने टिप्परला ब्रेक न लावता खड्डा वाचविण्यासाठी रस्त्याच्या कडेला नेला.परंतु टिप्पर वेगात असल्याने चालकाचे टिप्परवरील नियंत्रण सुटले व टिप्पर उलटला.यात अनमोल वट्टी घटनास्थळीच ठार झाला,तर वाहक खुशाल चौधरी गंभीर जखमी झाला.त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.रेतीघाट बंद असतांनाही रेतीचा उपसा करून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत आहे.ही अवैध रेती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भरधाव वेगात टिपर हाकून मोठी रक्कम कमविणारे रेतीमाफिये चालक व वाहकांना नेहमीच मृत्यूशी खेळायला भाग पाडतात. ग्राम मोरवाही येथील पोलिस पाटील विनोद ठाकूर यांच्या तक्रारीवरून  अपघातातील चालक मृत अनमोल वट्टी व टिप्पर मालक परवेज पठाण वय ४० वर्षे,रा.तिरोडा या दोघांवर भारतीय न्याय संहिता कलम २८१,१०६ (१), १२५ (ए),३०३,(२), ४९ सहकलम १८४ मोटार वाहन कायद्यान्वये पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहूल खारकर करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे व धोरणात्मक बदल जारी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वाळू आणि वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट...

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!