Tuesday, July 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअभिनेता धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड; ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

अभिनेता धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड; ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-बॉलीवूड मधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांनी आज,सोमवार २४ नोव्हेंबरला  मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीवस्थामुळे धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते व त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. अश्यातच आज सकाळच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावल्याने निधन झाले.त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र गेल्या सहा दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत आहेत.त्यांचा ‘इक्किस’ हा शेवटचा चित्रपट येत्या २५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. २०१२ मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.धर्मेंद्र यांनी दोन लग्न केले. त्यांचे पहिले लग्न प्रकाश कौर यांच्याशी झाले होते. त्यांच्यापासून त्यांना चार मुले आहेत.सनी देओल,बॉबी देओल,विजेता देओल आणि अजिता देओल.त्यांनी १९८० मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनीशी लग्न केले.धर्मेंद्र यांनी दुसऱ्या लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता.हेमा मालिनीपासून त्यांना दोन मुली ईशा देओल आणि अहाना देओल या आहेत. धर्मेंद्र यांच्या निधनाने देओल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!