Thursday, August 27, 2026
Homeभंडाराअन् मृतदेह ठेवून सैरावैरा पळू लागले नागरिक….-कुणी तणसीच्या ढिगात लपले तर कुणी...

अन् मृतदेह ठेवून सैरावैरा पळू लागले नागरिक….-कुणी तणसीच्या ढिगात लपले तर कुणी नदीच्या पाण्यात घेतली उडी……

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- पवनी तालुक्यातील कोदूर्ली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाश्यांनी हल्ला केला असल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सायंकाळी घडली.होमगार्ड असलेले नाना मेश्राम यांची आई अंजनाबाई मेश्राम यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर कोदुर्ली गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक व ग्रामस्थ स्मशानभूमीकडे जात असताना मधमाश्यांनी अचानक हल्ला केला.हल्ल्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी झालेले नागरिक घाबरले आणि वाट मिळेल त्या दिशेने सैरावैरा पळू लागले.यामुळे एकच खळबळ उडाली. स्मशानभूमीपासून काही अंतरावर मृतदेह ठेवून काही नागरिक गावाच्या दिशेने,तर काही जवळील तणसीच्या ढिगात लपले.काहींनी वैनगंगा नदीच्या पाण्याचा उडी घेतली.परंतु, बराच वेळ मधमाश्यांनी पिच्छा सोडला नव्हता.त्यामुळे नागरिक चांगलेच घाबरले होते.यात ३० नागरिक किरकोळ जखमी झाले, तर पाच नागरिकांना ग्रामीण रुग्णालय पवनी येथे दाखल करण्यात आले. जखमींच्या प्रकृतीत सुधारणा असल्याची माहिती आहे.मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात २५ ते 30 नागरिक किरकोळ जखमी झाले.गंभीर जखमी झालेले नातेवाईक व ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालय व खासगी रुग्णालय गाठून उपचार सुरू केला आहे.ग्रामीण रुग्णालयात सिंधू चव्हाण,सुशीला बनसोड,सुभाष चव्हाण, शुभम रामटेके,घनश्याम खोब्रागडे यांच्यावर उपचार करण्या आले.मधमाश्यांचा हल्ला थांबल्यानंत मोजक्याच नागरिकांच्या पुढाकारा मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!