Thursday, April 30, 2026
Homeचंद्रपूरअन् 'त्या' पठ्ठ्याने लाच म्हणून शेतकऱ्यांना मागितले २० किलो तांदूळ….-विद्युत वितरण कंपनीच्या...

अन् ‘त्या’ पठ्ठ्याने लाच म्हणून शेतकऱ्यांना मागितले २० किलो तांदूळ….-विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचा प्रताप…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- लाच घेण्याचा हल्ली नवनवीन फंडा जरी वापरला जात असला तरीही एक ना एक दिवस घडा भरल्याशिवाय राहणार नाही.गोर-गरीब जनतेचे जेवढे मन दुखवाल तेवढीच गोर गरीबांची हाय लागणार आहे.अशीच हाय विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यास लागली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दोन लाचखोरांना वेगवेगळ्या कारवाईत अटक केली. विशेष बाब म्हणजे राजुरा तालुक्यात महावितरणच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला पैसे नसतील तर लाचेपोटी २० किलो तांदळाची मागणी केली.एसीबीने त्या कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले.लाचेत तांदळाची मागणी करणारी भ्रष्टाचाराची जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. तर दुसरी लाचेची कारवाई ही ब्रम्हपुरी तालुक्यातील आहे.कंत्राटदाराकडून लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला ताब्यात घेण्यात आले.या दोन्ही कारवाया एसीबीने शुक्रवारी केल्या.

राजुरा तालुक्यातील शेतकऱ्याने शेतात पाणीपुरवठा करण्यासाठी विद्युत पंपाची व्यवस्था केली होती.मात्र पंपासाठी थ्री फेज विद्युत पुरवठा असण्याची गरज असते.फिर्यादी व इतर शेतकऱ्यांचे शेत विरूर महावितरण कार्यालय अंतर्गत येते व विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवण्याचे काम राजुरा उपविभागीय वरिष्ठ तंत्रज्ञ शालेंद्र देवराव चांदेकर यांच्या अंतर्गत येते.विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी चांदेकर यांनी फिर्यादी व इतर शेतकऱ्यांना प्रत्येकी २० किलो तांदूळ व दीड हजार रुपये असे एकूण ७ हजार ५०० रुपयांची मागणी केली होती.पैसे देण्याची इच्छा नसलेल्या फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.शुक्रवारी चंद्रपूर लाचलुचपत विभागाने सापळा रचत ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शालेंद्र चांदेकर याला अटक केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!