Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरअन्य गुराख्यांसमोरच एका गुराख्याला वाघाने केले ठार...

अन्य गुराख्यांसमोरच एका गुराख्याला वाघाने केले ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जनावरांना चारण्यासाठी जंगलात घेऊन गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना काल,मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी  दुपारी एकच्या सुमारास सावली वनपरिक्षेत्रातील राजोली मरेगाव शेतशिवरात घडली.वासुदेव झिवरू पेंदोर वय ६० वर्षे,रा.मरेगाव असे गुराख्याचे नाव आहे.
मूल तालुक्यातील मरेगाव येथील वासुदेव पेंदोर आपल्या बैलांना चारण्यासाठी सावली वनविभागाच्या राजोली क्षेत्रातील मरेगाव येथील सर्व्हे नं.१११ मध्ये गेले होते.शेतशिवाराला लागून असलेल्या जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही अंतरावरच असलेल्या अन्य गुराख्यांसमोरच ही घटना घडल्याने त्यांनी गावात जाऊन ही माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.सावली वनविभागातर्फे मृताच्या कुटुंबियांना २५ हजाराची तात्काळ आर्थिक मदत करण्यात आली.आतापर्यंत तीन ते चार गुराखी शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार झाले आहेत.मात्र, वनविभाग हल्ले रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना करत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!