Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरअखेर भोंदूबाबाच्या जाळ्यातून महिलेची सुटका..! - टार्गेटवर असायचे कष्टकरी व गरीब लोक..

अखेर भोंदूबाबाच्या जाळ्यातून महिलेची सुटका..! – टार्गेटवर असायचे कष्टकरी व गरीब लोक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-आजही बरेच सुशिक्षित लोकं भोंदू बाबांच्या भूलथापांना बळी पडतांना दिसून येतात.भोंदूगिरी करणाऱ्या बाबांकडे कुठल्याही प्रकारची दैवशक्ती वा साधना नसते.बोलबच्चन तसेच इतर फसगत करणारी हतकंडे वापरून ते अनेकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत असतात.अश्याच प्रकारे बाहेर ठिकाणाहून आलेला आणि नागपुरात स्थायिक झालेल्या एका ५५ वर्षीय भोंदू बाबाने महिलेला जाळ्यात ओढून कुटुंबावरील संकट दूर करण्याच्या नावाखाली तिच्या घरात प्रवेश मिळविला व गेल्या अनेक दिवसांपासून तो तिच्यासोबत अश्लील कृत्य करीत होता.त्याने महिलेच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली होती.तसेच महिलेला त्याने नग्न पूजेचा व्हिडीओदेखील पाठविला होता. अखेर महिलेने हिंमत दाखवून पोलिसांकडे धाव घेतली.प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.हबिबुल्ला मलिक ऊर्फ मामा ऊर्फ लाल बाबा ऊर्फ अनवर अली मुल्लीक वय ५५ वर्षे,प्रेमनगर,झेंडा चौक,शांतीनगर, नागपूर असे आरोपीचे नाव आहे.तो स्वतःला तांत्रिक म्हणवून घेत होता व संकटात असलेल्या महिला पुरुषांचा शोध घेतो.तक्रारदार महिलेचा पतीशी घरगुती कारणांवरून बऱ्याच दिवसांचा वाद सुरू होता व ही बाब हबिबुल्लाला कळाली.त्याने मी तुझी समस्या तंत्रमंत्राने दूर करू शकतो,असा दावा केला व महिलेशी ओळख वाढवली.त्याने त्यानंतर तिच्या पतीशी मैत्री केली व त्या माध्यमातून त्यांच्या घरात प्रवेश मिळविला.तो तिचा पती नसतांना जानेवारी २०२४ पासून घरी जाऊ लागला.त्याने तिला मेणबत्ती व दिवा लावून पूजा करतांनाचा नग्न व्हिडीओ पाठविला होता व तुझ्यासाठीच हे तंत्रमंत्र सुरू असल्याचा दावा केला.महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला.त्यानंतर त्याने घरी येत तिच्याशी लगट सुरू केली व काही वेळा तिच्यासोबत अश्लील कृत्यदेखील करण्याचा प्रयत्न केला.तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तंत्रमंत्राने तिचा मुलगा व पतीला जीवे मारण्याची धमकी दिली.त्यामुळे घाबरून महिला गप्प बसली.काही दिवसांअगोदर त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.यामुळे हादरलेल्या महिलेने अखेर पाचपावली पोलिस ठाण्यात धाव घेतली व तक्रार केली.पोलिसांनी हबिबुल्लाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
  • कष्टकरी व गरीब लोक टार्गेटवर👇
भोंदूबाबाच्या टार्गेटवर कष्टकरी व गरीब लोक असायचे.त्याच्या भागात तो ‘मामा’ म्हणून प्रसिद्ध होता.हबिबुल्ला सर्वसाधारणतः परिसरातील चहा टपरींवर जाऊन थांबायचा.तिथे लोकं घरातील समस्या बोलत असतांना तो त्यांना हेरायचा व मी काळी जादू करू शकतो,असे म्हणत त्यांना जाळ्यात ओढायचा. त्याने अशा पद्धतीने आणखी महिलांनादेखील फसविले आहे का याचा शोध सुरू आहे.मी काळी जादू जाणतो, असे हबिबुल्लाने महिलेला म्हटले होते.त्याने तिला नग्न पूजा करत व्हिडीओ पाठविला होता.तो पाहून महिला हादरली होती.मात्र त्याने या माध्यमातून तिच्यावर मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.तो मूळचा पश्चिम बंगालमधील असून,मागील २० वर्षांपासून नागपुरातच स्थायिक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!