Monday, July 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरपंचांची वर्णी..

अखेर ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरपंचांची वर्णी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील हजारो ग्रामपंचायतीतील दर पाच वर्षांनी निवडून येणाऱ्या व गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरपंचाची वर्णी लागणार असल्याचे आदेश शासनाने दिले असतांनाच  अखेर ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी सरपंचाची नियुक्ती करण्याचे आदेश गट विकास अधिकाऱ्यांनी विविध जिल्ह्याच्या ग्रामपंचायतींना दिले आहेत.त्या अनुषंगाने बऱ्याच ग्रामपंचायतीत उद्या,सोमवार ९ मार्च रोजी सरपंच प्रशासक तर उपसरपंच व सदस्य प्रशासकीय समितीमध्ये विराजमान होणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील असंख्य ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळाची मुदत संपली आहे. मात्र,मुदत्त संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे सध्या शक्य नसल्याने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरपंच यांची नियुक्ती करण्याठ यावी, असे आदेश शासनाने दिले होते.या आदेशानुसार   प्रशासक व प्रशासकीय समितीचा कार्यकाळ ६ महिन्यांचा राहील.परंतु,निवडणूक प्रक्रिया ६ महिन्यांपूर्वी पूर्ण झाल्यास संबंधित दिवशीच  प्रशासक व प्रशासकीय समिती संपुष्टात येईल.तोपर्यंत सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणार असल्याने सरपंच संघटनेत सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरल्याचे चित्र दिसत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!