उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या परिपत्रकानुसार पोर्टलद्वारे ऑनलाईन आधार कागदपत्र अद्ययावत करण्याकरिता पुढील ३ महिने म्हणजे दिनांक १५ मार्च ते १४ जूनपर्यंत मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ज्या नागरिकांच्या आधार कार्डला १० वर्षे पूर्ण झाली आहेत अशा सर्व नागरिकांनी आधारला ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अद्ययावत करावे.
आधार कागदपत्र अद्ययावत करण्याकरिता आपल्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर ५० रुपये शुल्क आकारण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. आधार क्रमांक हा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून उदयास आला आहे.विविध शासकीय योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे.शासकीय योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांनी आपला आधार डाटा वैयक्तिक तपशीलासह अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.याबाबत अधिक माहितीकरिता www.uidai.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांनी भेट द्यावी.