Thursday, October 15, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यात काँग्रेसचे 'हात से हात जोडो' अभियानास सुरुवात...- कुरुड येथे अभियानास...

देसाईगंज तालुक्यात काँग्रेसचे ‘हात से हात जोडो’ अभियानास सुरुवात…- कुरुड येथे अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- तालुक्यात काँग्रेसचे ‘हात से हात जोडो’ अभियानास सुरुवात झाली असून तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या कुरुड गावामध्ये काँगेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर अखिल भारतीय काँग्रेसने सुरू केलेल्या ‘हात से हात जोडो’ मोहिमेचे आज २२ मार्च २०२३ रोजी शुभारंभ आणि संपूर्ण गावात,घरोघरी,चौका-चौकात लोकांच्या भेटी घेत सदर अभियानाचे महत्व व इतर बाबी कुरुड येथील नागरिकांना पटवून देण्यात आले आहे.

‘हात से हात जोडो’ अभियाना प्रसंगी ‘नफरत छोडो भारत जोडो’ च्या घोषणा देत संपूर्ण गावात रॅली काढण्यात आली.अभियानात मोठ्या संख्येने गावातील नागरिकांनी सहभाग घेतला होता.काँग्रेसला साथ देऊन देशाला अंधाराच्या गर्दीतून प्रकाश वाटेवर घेऊन जाऊया आणि पुन्हा एकदा स्वर्णीम भारत घडवू; असे पत्रक नागरिकांना वितरित करण्यात आले.

‘हात से हात जोडो’अभियान निमित्ताने ओबीसी काँग्रेस जिल्हा सचिव मनोज ढोरे यांच्या नेतृत्वात देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले,देसाईगंज तालुका उपाध्यक्ष नितीन राऊत, विसोरा ग्रामपंचायत उपसरपंच संजय करंकर,पंकज चहांदे युवक तालुका अध्यक्ष,भीमराव नगराडे माजी नगरसेवक नगरपरिषद देसाईगंज,सुरेश मेश्राम माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली,मनोहर निमजे तालुका महासचिव,सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभालवर,जगदीश शेंद्रे,ज्येष्ठ नेते नामदेव मिसार,युवा नेते अमर भर्रे,अशोक कुथे,सोमेश्वर  दिवठे,भाऊराव चौधरी,माणिक बेद्रे,लक्ष्मीकांत शिलार,ज्ञानेश्वर ठाकरे, डाकराम भूर्रे,एकनाथ बुराडे,प्रभाकर ठाकरे,गणेश भोयर,रवींद्र कांबळी,गणपत बेदरे,दिनेश टेंभुर्ण  काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने अभियानात सहभागी झाले होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाचन संस्कृतीच्या चळवळीत महात्मा गांधी शाळेचा पुढाकार.. – आज ‘ग्रंथालय आपल्या दारी’ उपक्रमाचा दिमाखात शुभारंभ; वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून ज्ञानसमृद्ध,वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली आणि स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज अशी पिढी घडविण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक...

संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सज्ज.. – “पाणी अडवा,पाणी जिरवा”चे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता गृहीत धरून गडचिरोली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण...

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!