Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंज३५ वर्षीय इसमाचा तलावात बुडून मृत्यू.. - देसाईगंज तालुक्याच्या चोप येथील आजची...

३५ वर्षीय इसमाचा तलावात बुडून मृत्यू.. – देसाईगंज तालुक्याच्या चोप येथील आजची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या चोप येथील एका ३५ वर्षीय इसमाचा गावापासून दीड किलोमिटर अंतरावरील कसारी मार्गे तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,सोमवार ९ डिसेंबरला सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.संजय शंकर करपते वय ३५ वर्षे,रा.चोप,ता.देसाईगंज असे तलावात बुडून मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,संजय करपते हे आज सकाळच्या सुमारास घरून कुऱ्हाड घेऊन गावापासून काही अंतरावर असलेल्या जंगल परिसरात गेले होते. अशातच गावातील काही नागरिक जंगल परिसरात गेले असता,त्यांना गावापासून दीड किलोमिटर अंतरावरील कसारी मार्गे असलेल्या पाटलीन तलावात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक इसम तरंगताना आढळून आला.सदर इसम कुठलीही हालचाल करीत नसल्याने घटनेची माहिती देसाईगंज पोलिसांना देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढून बघितले असता मृताची ओळख पटली.त्यानुसार देसाईगंज पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात पाठवून मर्ग दाखल केला आहे.संजय हा तलावाच्या पाळीवरून जात असतांना पाय घसरून तलावात पडला असावा; असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.सदर घटनेचा पुढील तपास देसाईगंज पोलीस प्रशासन करीत आहे.संजय पश्चात तीन वर्षाचा मुलगा,पत्नी, व आई असा आप्त परिवार असून संजयच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!