Monday, September 21, 2026
Homeदेसाईगंज१९ वर्षीय युवकाचा देसाईगंज-ब्रम्हपुरी वैनगंगा नदीत बुडून मृत्यू.. - देसाईगंज शहरातील युवक;...

१९ वर्षीय युवकाचा देसाईगंज-ब्रम्हपुरी वैनगंगा नदीत बुडून मृत्यू.. – देसाईगंज शहरातील युवक; आजची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-सर्वत्र रंगपंचमीचा (शिमगा)उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतांनाच ऐन सणाच्या दिवशीच देसाईगंज शहरातील एका १९ वर्षीय युवकाचा देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शुक्रवारी १४ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.अथर्व हिवराज सहारे वय १९ वर्षे,रा.एकता कॉलनी, देसाईगंज,जि.गडचिरोली असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे.
आज सकाळच्या सुमारास सर्वत्र एकमेकांना रंग लावून मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. आबालवृद्ध रंगामध्ये न्हाऊन गेले आहेत.अशातच अथर्व सहारे व काही सहकारी मित्र रंग खेळल्यानंतर अंगावरील रंग काढण्यासाठी देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदी तीरावर आंघोळीसाठी गेले होते.आंघोळ करीत असतांना अथर्व सहारे खोल पाण्यात उतरला.पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला.सहकारी मित्रांनी आरडा-ओरड केली.त्यातच काही नागरिकांनी धाव घेत वाचविण्याचा प्रयत्न केला.परंतु,अथर्व सहारे खोल पाण्यात गेल्याने क्षणात होत्याचे नव्हते झाले व  पाण्यात बुडून मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती देसाईगंज पोलीस प्रशासनास देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतकाचे शव शवविच्छेदनाकरीता देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती.अथर्व सहारे याचे वडील हिवराज सहारे हे गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस विभागात कार्यरत असून अथर्व बीएससी प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता.ऐन सणाच्या दिवशीच अनुचित घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!