Tuesday, May 26, 2026
Homeगडचिरोली१९ वर्षीय दोन महिला नक्षलींसह पाच नक्षलवादी साहित्यासह ताब्यात.. - तीन महिला...

१९ वर्षीय दोन महिला नक्षलींसह पाच नक्षलवादी साहित्यासह ताब्यात.. – तीन महिला नक्षलींची नावे जाहीर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या लाहेरी उपपोलीसस्टेशन हद्दीतील बिनागुंडा परिसरात काही नक्षलवादी घातपात घडवून आणण्याच्या प्रयत्नात असल्याचे गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना गुपितरित्या माहिती मिळाली असता परिसरात दोन दिवसांपासून विशेष कृती दलाच्या जवानांची आठ पथके आणि केंद्रीय राखीव दलाचे पथक नक्षलवादविरोधी अभियान राबवित होते.नक्षलवादविरोधी अभियान राबवित असतांनाच बिनागुंडा गाव परिसरात पाच नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पथकाने अत्यंत शिताफीने पाचही नक्षलवाद्यांना आज,मंगळवार २० मे रोजी अटक केली.यातील तीन महिला नक्षलवाद्यांची नावे जाहीर करण्यात आली असून दोन नक्षलिंच्या वयाबाबत संभ्रम असल्याने पुढील प्रक्रिया सुरू आहे.
तिघांना अटक👇
१.उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमली (डीव्हीसीएम, प्लाटुन क्रमांक-३२, वय २८ वर्षे,रा.पल्ली,ता. भैरमगड,जि.बिजापूर,छत्तीसगड.
२.पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी (पीपीसीएम, प्लाटुन क्रमांक-३२,वय १९ वर्षे रा.कोंचल,ता. आवापल्ली जि.बिजापूर,छत्तीसगड.
 ३. देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता (सदस्य,प्लाटुन क्रमांक-३२,वय १९ वर्षे रा.मारोट बाकापंचायत ता. आवापल्ली,जि.बिजापूर,छत्तीसगड.
दोघांची पुढील कार्यवाही सुरू👇
दोन नक्षलवाद्यांच्या वयाबाबत ठोस पुरावा नसल्याने त्यांना बाल न्याय मंडळासमोर सादर करुन पुढील कार्यवाही सुरू आहे.पोलीसांच्या अभिलेखावर दाखल गुन्हांमध्ये त्यांचा सहभाग असल्याबाबत पडताळणी सुरु आहे.
विविध साहित्य हस्तगत👇
एक एसएलआर रायफल,एक ३०३ रायफल,तीन सिंगल शॉट रायफल,दोन भरमार बंदुका,तीन वॉकीटॉकी व ईतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
३६ लाखांचे बक्षीस👇
 महाराष्ट्र शासनाने उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमली
हिच्यावर १६ लाख,पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी  हिच्यावर ८ लाख,देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता  हिच्यावर ४ लाख तर इतर दोन नक्षलवादी सदस्यांवर
८ लाख रूपयांचे बक्षीस जाहिर केले होते.
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान)संदिप पाटील,पोलीस उप महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल,उप-महानिरीक्षक(अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा,पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, कमांडंट ३७ बटा.सिआरपीएफ,दाओ इंजिरकान कींडो, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश,अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक,पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथकाचे अधिकारी व जवान यांनी पार पाडली
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरात वाहनांच्या चोऱ्या करायचे अन् लाखनीत विकायचे; तिघांना बेड्या..

उद्रेक न्युज  नागपूर :-भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात कार्यरत असलेल्या सराईत वाहन चोरांच्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखा युनिट-एकच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या...

विद्यार्थ्यांना आता कोरोना काळासारखेच ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळण्याची शक्यता.. – इंधन दरवाढीचा परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांना मोठा झटका देण्यास सुरुवात केली आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या दरात...

आता वाघही पडणार गोंधळात; हल्ला करायचा की नाही?..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-हल्ली सर्वत्र वाघांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वाघ केव्हाही हल्ला करून जिविनिशी ठार करू शकतो.यासाठी भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात वाघांचे हल्ले...

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!