उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- यंदाच्या ९५ व्या ऑस्कर अवॉर्ड २०२३ ची नामांकन यादी जाहीर झाली असून एस एस राजामौली यांच्या आरआरआर सिनेमातून ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. नाटूनाटू हे गाणे बेस्ट ओरिजिनल साँग कॅटेगिरीसाठी नॉमिनेट झाले आहे. नाटू नाटू गाण्याने लेडी गागा आणि री-रीच्या गाण्यांना मागे टाकले आहे. नाटू नाटू गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळणे ही भारतीय सिनेमासाठी खूप गर्वाची बाब आहे.
नाटू नाटू हे गाणे अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.२०२२ मध्ये नाटूनाटू गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता.नाटूनाटूची हुक स्टेप सोशल मीडियावर चांगलीच हिट झाली होती.नाटू नाटू गाण्याला काही दिवसांआधीच होल्डन ग्लोब अवॉर्ड देखील मिळाला आहे.