Thursday, July 30, 2026
Homeगोंदियास्वगावी परतणाऱ्या बापलेकीवर काळाचा घाला; अपघातात दोघेही जागीच मृत्यू..

स्वगावी परतणाऱ्या बापलेकीवर काळाचा घाला; अपघातात दोघेही जागीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-चिमुकलीसह स्वगावी परतणाऱ्या बापलेकीवर काळाने घाला घातला असल्याची घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवारी गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खडकी बाम्हणी येथे रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
पत्नीला माहेरी सोडून आपल्या मुलीसोबत स्वगावी देवरी येथे परतणाऱ्या दुचाकीचालकाला खासगी बसने (ट्रॅव्हल्स)धडक दिली.दिलेली धडक इतकी भीषण होती की,दुचाकीचालक वडिलांसह चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.सूरजलाल वसाके वय ३३ वर्षे व वेदिका सूरजलाल वसाके वय ७ वर्षे, दोन्ही रा.देवरी असे मृत झालेल्या बापलेकीचे नाव आहे.सूरजलाल व त्यांची मुलगी सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमाराकडून देवरीला दुचाकीने जात होते.यादरम्यान,देवरीच्या दिशेने भरधाव येणाऱ्या सीजी-१९एफ-०३२६ क्रमांकाच्या खासगी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडकेत वडील व मुलगी दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.अपघातानंतर बाम्हणी-खडकी येथील व परिसरातील संतप्त नागरिकांनी सुमारे ४ तास रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान,देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांनी घटनास्थळ गाठून संतप्त नागरिकांची समजूत घातली व महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!