Sunday, September 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळी नंतरच; पण मतांची जुळवणी करणारी मशीन नसणार..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळी नंतरच; पण मतांची जुळवणी करणारी मशीन नसणार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज,मंगळवार ५ ऑगस्ट रोजी नाशिक विभागातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.बैठकीस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट केले. निवडणुका तर होणार,मात्र व्हीव्हीपॅट मशीन नसणार आहे.आपण ज्यांना मतदान केले,त्याची पावती व्हीव्हीपॅट मशीनवर दाखवत होती.अश्यातच विरोधी पक्षांनी यापूर्वी अनेकदा ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन मधील मतांची जुळवणी करण्याची मागणी केली होती.त्यामुळे निवडणूक आयोग मोठ्या पेच प्रसंगात पडला होता.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पण कोणत्या निवडणुका प्रथम होणार,हे अद्याप निश्चित करण्यात आले नाही.सर्व निवडणुका एकाचवेळी घेतल्या तर मनुष्यबळाची समस्या निर्माण होईल.असेही निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी म्हटले आहे. आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन नसेल तर विरोधक आणखी निवडणूक आयोगाला धारेवर धरण्याची शक्यता बळावली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!