ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-शरीरास जेवढे आवश्यक आहे,तेवढेच सेवन केले पाहिजे; त्यामध्ये खाणे असो वा पिने असो,एकदा का मशीनमध्ये गडबड वा बिघाडी निर्माण झाली की,त्याचा शेवट भयावह असतोच.असाच प्रकार ब्रम्हपुरी शहरात उघडकीस आला आहे.दारूचे अती सेवन केल्याने सीआरपीएफ कर्मचाऱ्याचा ज्या ठिकाणी पडून राहिला त्याच ठिकाणी अंत झाला. ब्रम्हपुरी शहरातील देसाईगंज रोडवरील कूर्झा कार्नर येथे भर चौकातील अवैध दारू विक्रेत्याच्या घराजवळ मृतावस्थेत एक व्यक्ती आढळला.रमेश राखडे वय ४९ वर्षे,रा.मिंधूर,ता.नागभीड असे मृताचे नाव आहे. शहरातील अवैद्य दारूविक्रेत्याच्या घरासमोर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला.चौकशी केल्यानंतर दोन तासानंतर त्याची ओळख पटली.तो सीआरपीएफचा कर्मचारी असून अती मद्य प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला.रमेश हा दिवाळीच्या सुट्टीमध्ये नागभीड येथील मिंधूर या आपल्या गावी आला होता.ब्रम्हपुरी पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले.घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहेत.
सीआरपीएफ कर्मचाऱ्याचा अतिदारू सेवनाने भर चौकातच मृत्यू… – ब्रम्हपुरी-देसाईगंज रोडवरील घटना..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES