- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली येथे एका घरात राजरोस सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली.यावेळी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यासह १२ जणांना ताब्यात घेतले असून आरोपींकडून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला.
असरअल्ली येथे ग्रामपंचायत सदस्य धर्मराज वडलाकोंडा याच्या घरात पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार,पोलिसांनी धाड टाकली.यावेळी १२ जणांना रंगेहाथ पकडले.सरपंच रमेश तैनेनी,ग्रामपंचायत सदस्य धर्माय्या वडलाकोंडा,विनो भूपती, रमाकांत गग्गुरी, सुखदेव मुत्तूनुरी, समय्या कावेरी, पोचन्ना ताडबोईना,रमेश गोतुरी,नागेंदर उल्ली,अर्जन्ना बेडके,मनोज बत्तुला, लक्ष्मीनारायण कटकम यांना ताब्यात घेतले.जुगाराच्या डावावरील २४ हजार ५०० रुपये,आरोपींकडे अंगझडतीत ७४ हजार ७९० रुपये, तीन दुचाकी,दहा मोबाईल असा एकूण २ लाख ३५ हजार २९० रुपयांचा माल जप्त केला.अंमलदार बापूराव काळे यांच्या फिर्यादीवरून असरअल्ली ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.सहायक निरीक्षक समाधान दौड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निखिल मेश्राम तपास करीत आहेत.
- Advertisement -

