- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसून येतो.त्यातच आता एआयची क्रेझ वाढलेली दिसून येते.एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलीजेन्स ज्याला मराठीत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ म्हणतात.हे एक नव्या युगाचे तंत्रज्ञान असून जी मशिनला मानवासारखी विचार,निर्णय,समस्या तसेच शिकण्याची क्षमता देत असते.आजच्या घडीला एआय आणि खास फोटो एडिट ॲप्सद्वारे आपले थ्रीडी, कार्टूनाइज्ड,विंटेज फोटो व ॲनिमेशन तयार करून सोशल मीडियावर अपलोड करण्याचा कल वाढलेला आहे.यात गोपनीयता व डेटा सुरक्षेची चिंता तर आहेच, तसेच या एडिटेड फोटोला ‘डीपफेक’ करून आक्षेपार्ह व्हिडीओ बनविला जाऊ शकतो.त्याचबरोबर दोन व्यक्तींना एकत्र दाखविणारा व खराखुरा वाटणारा फोटोही तयार केला जाऊ शकतो.यातून नाहक बदनामी होऊन मनःस्तापाला सामोरे जावे लागू शकते.त्यामुळे असे ॲप्स वापरतांना खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
एआय तंत्रज्ञानाचा वापर करून दोन वेगळ्या व्यक्तींचे चेहरे जोडून खोटे फोटो तयार केले जातात,जे खरे वाटतात.अशा खोट्या फोटोंमुळे समाजात गैरसमज निर्माण होतात.अशा घटनांचा काही तरुणी तसेच महिलांना देखील फटका बसला आहे.अश्याच प्रकारची घटना चालू वर्षातील जुलै महिन्यात गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आली होती.तिरोडा तालुक्याच्या लाखेगाव येथीय ३२ वर्षीय विवाहित महिला इन्स्टाग्राम वापरत होत्या.२४ मे २०२५ रोजी सकाळच्या सुमारास त्या मोबाइलवर इन्स्टाग्रामवर रिल्स पाहत असतांना एका अकाऊंटवर त्यांचा चेहरा असलेला आणि दुसऱ्या महिलेचे अर्धवट उघडे शरीर असलेला अश्लील फोटो आढळला होता.त्यानुसार गावातीलच २५ वर्षीय तरुणावर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत व बदनामीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
एआय आधारित साधने आणि मोफत उपलब्ध ॲप्स एका क्लिकमध्ये चेहरा बदलून किंवा फोटो मॉर्फ करून चुका संदर्भातील प्रतिमा तयार करू शकतात.या प्रतिमांचा वापर करून प्रत्यक्ष व्यक्तींचे फोटो डार्क वेबवर विकले जातात आणि त्यावरून ब्लॅकमेलिंगही केले जाते. काही वेळा पीडितांना त्याची माहितीदेखील नसते. याशिवाय सायबर फसवणुकीचे गुन्हेदेखील यातून होतांना दिसून येतात.तुम्ही जेव्हा फोटो एडिट करण्यासाठी ॲपला तुमच्या गॅलरीची किंवा कॅमेऱ्याची परवानगी देता,तेव्हा तुमचा डेटा त्यांच्या सर्व्हरवर अपलोड होतो.हा डेटा नंतर चुकीच्या कामांसाठी वापरला जाऊ शकतो किंवा विकला जाऊ शकतो.अनावश्यक परवानग्या देऊन स्वतःचा डेटा धोक्यात घालू नका.जर फसवणूक झालीच,तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा.तुमचा डिजिटल डेटा सुरक्षित ठेवणे ही तुमची जबाबदारी आहे,याची जाण नागरिकांना असली पाहिजे, असे सायबर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
- Advertisement -

