Monday, September 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान..! गॅस सिलेंडर बुकिंगच्या नावाने ऑनलाईन फसवणूकीचा नवा फंडा..

सावधान..! गॅस सिलेंडर बुकिंगच्या नावाने ऑनलाईन फसवणूकीचा नवा फंडा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-सध्याच्या घडीला सर्वत्र घरगुती गॅस सिलेंडरची बोंबाबोंब सुरू असून गॅस सिलेंडरच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत गॅस बुकिंगच्या नावाखाली ऑनलाइन फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत.सायबर गुन्हेगार नागरिकांच्या बँक खात्यांवर डोळा ठेवून विविध क्लृप्त्या वापरत असल्याचे अनेक प्रकरणांतून उघड झाले आहे.फोन कॉल,बनावट वेबसाइट,सोशल मीडियावरील संदेश तसेच व्हॉट्सॲप लिंकच्या माध्यमातून गॅस बुकिंग किंवा सबसिडी अपडेट करण्याचे आमिष दाखवले जात आहे.सायबर चोरटे स्वतःला गॅस एजन्सीचे कर्मचारी असल्याचे भासवून ग्राहकांशी संपर्क साधतात. “तुमची गॅस सबसिडी अपडेट करायची आहे”, “बुकिंग कन्फर्म करा” किंवा “गॅस कनेक्शन बंद होईल” अशा कारणांनी नागरिकांना घाईत माहिती देण्यास भाग पाडले जाते.त्यानंतर मोबाईलवर लिंक पाठवली जाते किंवा ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जाते.ही लिंक किंवा ॲप बनावट असून त्यावर वैयक्तिक व बँक तपशील भरताच सायबर गुन्हेगार खात्यावर ताबा मिळवतात.यानंतर काही मिनिटांतच बँक खात्यातून हजारो ते लाखो रुपयांची रक्कम काढली जात असल्याच्या घटना वाढल्या आहेत.अनेकांना पैसे कापल्यानंतरच फसवणुकीची जाणीव होते.विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि डिजिटल व्यवहारांबाबत कमी माहिती असलेले लोक या जाळ्यात अधिक अडकत आहेत.सायबर तज्ज्ञांच्या मते,गुन्हेगार लोकांच्या भीतीचा आणि सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेतात. “सबसिडी थांबेल” किंवा “कनेक्शन बंद होईल” अशा धमक्या देऊन नागरिकांना तात्काळ कृती करण्यास भाग पाडले जाते.मात्र बँक किंवा गॅस एजन्सी कधीही फोनवरून ओटीपी किंवा बँक तपशील मागत नाही,हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!