उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- लोकसंख्येच्या तुलनेत नागपूर शहरात प्रसाधनगृहांची संख्या कमी आहे;सार्वजनिक मुतारींची स्थिती दयनीय आहे.पब्लिक टॉयलेट अभावी महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सीताबर्डीसारख्या मार्केटमध्ये दोन सार्वजनिक शौचालय असून त्यातही अतिशय घाण आहे.त्यामुळे अखेर महिलांनीच पब्लिक टॉयलेटसाठी एल्गार पुकारला.नागपूर सिटिझन्स फोरमच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकात ‘राइट टू पी’ साठी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लक्षवेधी आंदोलन करून,अस्वच्छ व तुटलेल्या मुतारींचे फोटो आंदोलनस्थळी प्रदर्शित करण्यात आले.आंदोलनात सामाजिक कार्यकर्त्या,महाविद्यालयीन युवती, नोकरदार महिला व विविध बाजारपेठांमध्ये काम करणाऱ्या महिला सहभागी झाल्या होत्या.स्वच्छ व सुरक्षित प्रसाधनगृहांची मागणी करणारे फलक हाती घेत आंदोलनकर्त्या महिलांनी रोष प्रकट केला.
आंदोलनात योगिता शेंडे,जयश्री गाडगे,रेणुका लांडे, पूजा जांगडे,मीना कुंभारे,अमृता अदावडे,अपूर्वा पित्तलवार,शिप्रा विंचूरकर,आरती नान्हे,प्रियंका कारेमोरे,वैष्णवी गिरी,मनीषा राजवाडे,रजत पडोळे, वैभव शिंदे पाटील,अभिजीत झा,अभिजित सिंह चंदेल, अमित बांदूरकर,गौरव ठाकरे,प्रतीक बैरागी, शिवम उमरेडकर,प्रज्वल गोड्डे आदी उपस्थित होते.