Monday, August 31, 2026
Homeनागपूरसात वर्ग आणि फक्त तीन शिक्षक; विद्यार्थी काय शिकणार? - काँग्रेसचे विधिमंडळ...

सात वर्ग आणि फक्त तीन शिक्षक; विद्यार्थी काय शिकणार? – काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपुर :-एकीकडे शिक्षकांची पदे रिक्त आहेत,तर दुसरीकडे राज्यात ५५ हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याच्या बातम्या येतात.शिक्षण हा इतका महत्वाचा विषय असूनही सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत.सात वर्ग आणि फक्त तीन शिक्षक; विद्यार्थी काय शिकणार?राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ३७ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत.जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.त्यामुळे सरकारने या रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात,असे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज,शुक्रवार १२ डिसेंबरला विधानसभेत मागणी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.यावर बोलतांना वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली.सरकारने राज्यात शिक्षकांची किती पद रिक्त आहेत आणि एका मर्यादित कालावधीत या जागा भराव्या अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.यावर उत्तर देतांना मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्यात १५ हजार शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहिती सभागृहात दिली.यावर वडेट्टीवर यांनी आक्षेप घेतला.राज्यात ३७ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत,अधिकारी सरकारची दिशाभूल करत आहे.सरकारच्या पोर्टलचे नाव पवित्र असले तरी अपवित्र काम सुरू आहे,अशीही टीका वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!