Sunday, September 13, 2026
Homeनागपूरसातवीच्या निकालाचा टेन्शन घेत १२ वर्षीय मुलीने घर सोडले.. - जातांना चार...

सातवीच्या निकालाचा टेन्शन घेत १२ वर्षीय मुलीने घर सोडले.. – जातांना चार वर्षाच्या बहिणीलादेखील घेतले सोबत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे.जो स्पर्धेत टिकला तो समोर खूप काही शिकला.बऱ्याच परीक्षांचे व निकालांचे अनेक विद्यार्थी टेन्शन घेतांना दिसून येतात.मात्र,अशीही एक विद्यार्थिनी जिने चक्क सातव्या वर्गाच्या निकालाचे टेन्शन घेत घर सोडले.स्वतः घर तर सोडले सोबतच तिने आपल्या चार वर्षाच्या बहिणीलादेखील सोबत घेतले.अशातच घरचे रागावणार म्हणून घरी न जाता तिने तब्बल तीन तास शहरात चकरा मारल्याची घटना नागपूर शहरातील नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवारी घडली.यामुळे घरच्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.गुरुवारी १ मे ला महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन असल्याने सर्वत्र शासकीय सुट्टी होती.त्यामुळे काही शाळेतील शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल २ मे म्हणजेच काल शुक्रवारी लागणार होते.अशातच १२ वर्षीय मुलीचा सातव्या इयत्तेचा निकाल काल, शुक्रवारी २ मे ला  लागणार होता.यामुळे तिला तणाव आला होता.त्यामुळे ती तिच्या चार वर्ष वयाच्या बहिणीला घेऊन सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आजी-आजोबांसोबत उद्यानात खेळायला जात आहे; असे सांगून घरातून निघाली.मुली उशिरापर्यंत घरी परत न आल्याने घरच्यांनी शोध घेतला.मात्र,कुठेही पत्ता न लागल्याने शेवटी पालकांनी नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार केली व सोशल माध्यमांमध्ये माहिती शेअर करण्यात आली.तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.मुली राधाकृष्ण गार्डन ईश्वरनगर, गुरुदेवनगर,तिरंगा चौक,गजानन चौक,हेडगेवार चौक,जनरल आवारी चौक या मार्गाने पायी जात असल्याचे फुटेजमध्ये दिसून आले.त्या रेल्वेस्थानकात असल्याची माहिती मिळाल्यावर सहाय्यक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे हे पथकासह होम प्लॅटफॉर्मवर पोहोचले.तेथे त्यांना मुली सुखरूप आढळल्या.त्यांना नंदनवन पोलीस ठाण्यात नेण्यात आले.त्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आले.सदरची कार्यवाही वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयवंत पाटील, राहुल शिरे,मुकुंद ठाकरे,पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे,दिगंबर बोरकर यांच्या पथकाने केली.

घरचे रागावतील म्हणून रेल्वे स्थानकात👇
 
सायंकाळी सहा ते नऊ या कालावधीत त्या नागपुरातील रस्त्यांवर चालत होत्या.मात्र आता इतक्या उशिरा घराकडे परत गेलो तर घरचे रागावतील अशी भीती वाटली.त्यामुळे मुलगी चिमुकल्या बहिणीला घेऊन रेल्वे स्थानकाच्या आत जाऊन बसली.पोलिसांनी तिला विचारणा केली असता सुरुवातीला तिने अज्ञात व्यक्तीने कारमध्ये बसविल्याची बतावणी केली.मात्र त्यानंतर तिने सत्य सांगितले.ते ऐकून पोलिसांनादेखील आश्चर्याचा धक्काच बसला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे व धोरणात्मक बदल जारी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वाळू आणि वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट...

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!