Tuesday, August 18, 2026
Homeब्रम्हपुरीसट्टा-पट्टीचे आकडे घेणारा ताब्यात..!

सट्टा-पट्टीचे आकडे घेणारा ताब्यात..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरीत्या सट्टा-पट्टीचे आकडे घेणाऱ्यास ताब्यात घेत त्याच्याकडून २ हजार १५० रुपयांची रोख,सट्टा-पट्टीचे आकडे लिहिलेली चिठ्ठी,बॉलपेन व रायटिंग पॅड असा एकूण २ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.प्रकरणी देवेंद्र पंढरी रंगारी वय ४० वर्षे, रा.जुनी आंबेडकर शाळेजवळ,ब्रम्हपुरी यांस ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने मनोज उर्फ मुन्ना रामटेके याच्या सांगण्यावरून सट्टा-पट्टीचे आकडे घेत असल्याचे पोलिसांना सांगितल्याने या प्रकरणी रंगारी व रामटेके या दोघांविरोधात ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रम्हपुरी शहरातील अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी जयंत चुनारकर यांचे पथक दोन दिवसांपूर्वी परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना शहराच्या कुर्झा टी-पॉईंट परिसरातील पानटपरीजवळ एक व्यक्ती सट्टापट्टीचे आकडे घेत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पथकाने पंचांना सोबत घेऊन घटनास्थळी छापा टाकला असता देवेंद्र रंगारी हा चिठ्यांवर सट्टापट्टीचे आकडे लिहितांना आढळून आला. त्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले व पुढील कारवाई करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

जिल्हाधिकारी व एसपी रात्रीच पोहचले मार्कंडा देवस्थान परिसरात; विकास व संवर्धन कामांची केली पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग(एएसआय) यांच्यामार्फत सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी...

आता गडचिरोलीत होणार विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्थानिक मच्छीमार, मत्स्यकास्तकार,आदिवासी बांधव आणि बेरोजगार युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने गडचिरोली...

गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात आणले जाणार हिमालयीन काळे अस्वल आणि लाल रानकोंबड्या..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाघ आणि बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता नागपूरच्या गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्राला मोठा दिलासा मिळाला आहे.केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने तब्बल सात वाघ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!