Monday, August 17, 2026
Homeभंडारासंशय आल्याने दहा हजार घेण्यास नकार; पण तरीही गुन्हा दाखल.. -पोलीस हवालदारावर...

संशय आल्याने दहा हजार घेण्यास नकार; पण तरीही गुन्हा दाखल.. -पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-दाखल गुन्ह्यातील गुन्ह्याचे स्वरूप कमी करून तपासात मदत करण्याच्या नावाखाली दहा हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या एका पोलीस हवालदारावर भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.प्रकरणातील तक्रारदार व त्यांच्या मोठ्या भावाच्या विरोधात भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील करडी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता.सदरच्या गुन्ह्याचा तपास करडी ठाण्यातील पोलीस हवालदार प्रफुल चोखोबा वालदे करीत होते.तपासादरम्यान प्रफुल वालदे यांनी गुन्ह्याचे स्वरूप कमी करून तपासात मदत करण्याच्या नावाखाली तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.तक्रारदाराला लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.त्यानुसार,एसीबीच्या पथकाने सोमवार २९ जून २०२६ रोजी पडताळणी केली असता पोलीस हवालदार वालदे यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती दहा हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली.मात्र,सापळा कारवाईदरम्यान तक्रारदारावर संशय आल्याने पोलीस हवालदाराने लाचेची रक्कम स्वीकारण्यास असहमती दर्शवली.पण, लाचेची रक्कम मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने प्रफुल वालदे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये करडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर,माधुरी बाविस्कर अप्पर पोलिस अधीक्षक,विजय माहुलकर व भंडाराचे पोलिस उपअधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितेश देशमुख,मिथुन चांदेवार,अतुल मेश्राम,प्रतिक उके,मयुर सिंगणजुडे,पंकज सरोते आदींनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!