Monday, October 12, 2026
Homeनागपूरसंशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या हैवान पतीने पत्नीला बेदम मारहाण करून तिची हत्या केली.सुरुवातीला त्याने पत्नीच्या हत्याकांडाला अपघाताचे स्वरूप दिले खरी,पण शवविच्छेदन अहवालात त्याचे खरे रूप समोर आले.ही घटना नागपूरच्या कपिलनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कामगारनगरातील म्हाडा क्वॉर्टरमध्ये घडली. लक्ष्मी रोशन शाहकार वय ३५ वर्षे, असे मृतक पत्नीचे नाव आहे.तर रोशन किशोर शाहकार वय ४२ वर्षे असे अटकेतील आरोपी पतीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आरोपी रोशनला काही दिवसांपासून पत्नीचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.गुरुवार १ ऑक्टोंबरच्या रात्रीही दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला.वाद वाढल्यानंतर रोशनने लक्ष्मीला बेदम मारहाण केली.यात ती गंभीररीत्या जखमी झाली.त्यानंतर,त्याच रात्री रोशनने तिला रुग्णालयात नेले.रुग्णालयात डॉक्टरांनी लक्ष्मीला मृत घोषित केले.डॉक्टरांनी त्यास विचारणा केल्यावर पायऱ्यांवरून पडल्याने डोक्याला दुखापत झाल्याचे डॉक्टरांना सांगितले.रुग्णालयाकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.दरम्यान, शवविच्छेदन अहवालात लक्ष्मीच्या शरीरावर अंतर्गत दुखापती आढळून आल्याने पोलिसांना मृत्यूबाबत संशय निर्माण झाला.पोलिसांनी रोशनची कसून चौकशी केली असता पत्नीला मारहाण केल्याची त्याने कबुली दिली. त्यानंतर,पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून रोशनला अटक केली.विशेष म्हणजे,रोशनविरुद्ध यापूर्वीही पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा गुन्हा दाखल होता.रोशनने २००६ मध्ये एका व्यक्तीची हत्या केली होती.या गुन्ह्याच्या सुनावणीदरम्यान तो कारागृहातून जुलैमध्ये जामिनावर बाहेर आला होता. त्यावेळी नात्यातील लक्ष्मीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले आणि पुढे दोघांनी विवाह केला.त्यांना तीन आणि सात वर्षांची दोन मुले आहेत.संबंधित हत्या प्रकरणातून दोषमुक्त झाल्यानंतर रोशन आरटीओ एजंट म्हणून काम करू लागला.दरम्यान,रोशन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी वारंवार वाद घालायचा,यातूनच त्याने पत्नीला बेदम मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूमुळे तीन आणि सात वर्षाच्या दोन मुलांवरील ममतेचे छत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सीईओचा कारवाईचा सपाटा; आता चातगावचा ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच काही दिवसांपूर्वी शासकिय निधीचे नुकसान करणे व इतर अनियमितता करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक...

पायाला चिखल माखल्याने धुण्यासाठी मोठ्या नहराजवळ गेले अन् विपरीत घडले; पती-पत्नीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेत पाहण्यासाठी शेतीवर गेले असता पायाला चिखल माखल्याने पाय धुण्यासाठी गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याजवळ(मोठा नहर)गेले असता पत्नीचा पाय घसरला आणि ती पाण्यात...

अखेर ‘त्या’ तरुणाची ओळख पटली; रेल्वेने कटून शरीराचे झाले होते दोन तुकडे..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एका अज्ञात तरुणाचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी सकाळच्या सुमारास देसाईगंज शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या देसाईगंज-गोंदिया मार्गावरील तुकुम परिसरातील...

आणखी एका शेतकऱ्याने तलावात उडी घेत संपवले जीवन..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी विहिरीत उडी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!