संपादक/ सत्यवान रामटेके
उद्रेक न्युज वृत्त :- एखादेवेळी काही प्रकरणे सार्वजनिक हिताची म्हणून उघड करावी लागतातच; मात्र काही प्रकरणातील सार्वजनिक हित जोपासून भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडण्याचा कितीही प्रयत्न जरी केला; तरी केलेले प्रयत्न असफल ठरतात.याचे मुख्य कारण म्हणजे आम्ही तक्रार करायची आणि ज्यांच्याकडे तक्रार केली जाते; त्यांचे खिसे गरम होतांना दिसून येतात.नकळत खिसे गरम झालेले एवढ्यावरच थांबत नाही तर पलटी होऊन घडलेल्या प्रकरणाची जणूकाही अशांना कल्पनाच नसते; असे भासवित असल्याने शेवटी तक्रार कर्ते हताश होऊन ‘जाऊ द्या नं..! आमच्या बापाचा काय जातोय? असे म्हणून गप्प बसतात.
मुख्यत्वे गप्प बसणाऱ्या व्यक्तींवर समाज माध्यमातून अनेक ठिकाणांहून टीका-टीप्पणी केली जाते.काही ठिकाणी चक्क तक्रार कर्त्यावरच आरोप लावले जातात.तक्रार कर्ता गप्प बसला म्हणजे ‘त्याची सेटिंग झाली असावी’, ‘ हे पैशासाठीच करतात ‘ अशी अनेक टीका-टिप्पणी करून सर्वजण मोकळे होतात.मात्र खरी परिस्थिती वेगळीच असते.ज्यांचे खिसे गरम केले जातात त्यांनाही वाटते की,सगळे काही आमच्याच हातात आहे; असे म्हणून भ्रष्टाचाऱ्यांची बाजू घेऊन थातुर-मातुर चौकशी करून प्रकरणे दाबण्याचा प्रयत्न करीत असतात.
खरे म्हणजे समोरील व्यक्तीने आपली बाजू उत्कृष्ट व सबळ रहावी; याकरिता कितीही खिसे गरम केले वा आपला कितीही बोलबाला करून अनेकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न जरी केला; तरीही असा व्यक्ती कायद्याच्या कचाट्यातून कधीही सुटूच शकत नाही.आज ना उद्या भांडाफोड होणारच.आजच्या स्थितीत ‘ पैसा करे,कैसा’ असे जरी असले तरीही सर्वच ठिकाणी पैसाच काम करतो असेही नाही व सर्वच भ्रष्ट असतात असे म्हणता येणारही नाही; काहीजण याला अपवाद सुध्दा आहेत.ज्यांचे खिसे गरम केले गेले आहेत; अशांनी भ्रमात जाऊ नये; एक ना एक दिवस ‘अती तिथे माती’ झाल्याशिवाय राहणार नाही.

