- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर कार्यकर्ते,पदाधिकारी अती उताविळपणा दाखवून अनेक ठिकाणी गावागावात राजकारणामुळे भावकी,नातेवाईक व मित्रमंडळी दुरावली गेली होती. परंतु,निवडणुकीचे मतदान पार पडत असतांना आता ‘संपले गावचे इलेक्शन,आता जपा रिलेशन’ यांसह आदी पोस्ट काही ठिकाणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालतांना दिसून आलेत.
राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो तर कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो.परंतु, अलीकडील काळात होणारे सर्वच राजकारण काही वळणावर गेलेले आहे.निवडणुका दोन दिवसांच्या असतांना मात्र नात्यांमध्ये व मैत्रीमध्ये कायमचा दुरावा निर्माण होत असतो.वेगवेगळ्या पक्षांचे नेते निवडणुकीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून निवडणुका संपल्यावर सर्व काही विसरून सर्व नेतेमंडळी एकत्र येत असतात.परंतु,नेत्यांचे चेले- चपाटे व कार्यकर्ते हे निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेपासून एकमेकांना मोठा विरोध दाखवून गावांमध्ये मोठे वेगवेगळे गट निर्माण करत असतात.मात्र,मतदान संपताच ‘संपले गावचे इलेक्शन आता जपा रिलेशन’ असे सांगण्याची वेळ येऊ नये; याकरीता ‘झाले गेले गंगेला मिळाले’ असे मानून रिलेशन जपणे आवश्यक आहे.
- Advertisement -