Tuesday, September 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसंजय गांधी विभागातील आयटी असिस्टंटच्या मानधनात वाढ करण्याची मागणी..

संजय गांधी विभागातील आयटी असिस्टंटच्या मानधनात वाढ करण्याची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सामाजिक न्याय विभागा अंतर्गत संजय गांधी विभागात कार्यरत ४१९ आयटी असिस्टंटच्या मानधनात वाढ करण्यात यावी,अशी मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटी आयटी असिस्टंट कर्मचारी संघटनेच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
राज्याच्या संजय गांधी विभागात आयटी असिस्टंट कर्मचारी हे २०१४ पासून जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांमध्ये संगणकीय तांत्रिक कार्य पार पाडत आहेत.अत्यल्प मानधन असूनही संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थीची माहिती अद्ययावत करणे,डीबीटी पोर्टल, एनसएपी व पीफएमस प्रणालीद्वारे पेंशन वितरण यासारखी महत्त्वाची कामे करीत आहेत.मात्र,गेल्या दहा वर्षांपासून मानधनात वाढ झालेली नाही.त्यामुळे सेवेला स्थैर्य,शासनमान्य वेतनश्रेणी,वार्षिक वेतनवाढ, सेवा सुरक्षा,भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय सुविधांचा समावेश,मानधन थेट शासन स्तरावरून वितरित करावे इत्यादी मागण्या मान्य करण्यात याव्यात,असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन सादर करतेवेळी अनिल उबाळे व किरणराज पंडित यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कंत्राटी आयटी असिस्टंट कर्मचारी संघटनेच्या ज्योती जाधव, योगिता चव्हाण,सीमा शरणागत,कृष्णा पवार,आमेर शेख,करण सोनवणे,पोपट जामकर,आसिफ पठाण आदी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

लाईनमनला ‘एसीबी’चा जोरदार झटका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका ३६ वर्षीय कंत्राटी लाईनमनला नागपूरच्या एसीबी पथकाने तब्बल ८ हजार ५०० रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडुन जोरदार झटका दिला आहे.मुकेश...

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!