- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-शेतकरी व टेम्पो चालक टेम्पोमध्ये बैलजोडी घेऊन जात असतांना वाटेतच एका वाहनातून दोघे उतरून टेम्पो अडवतात व जप्तीच्या कारवाईचा धाक दाखवून दोनशे रुपये मागणी करून घेऊन जातांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सदर प्रकरणी संताप व्यक्त केला आहे.वडेट्टीवार यांनी दोनशे रुपये घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेकडे केली आहे.
शेतकरी रात्रंदिवस शेतात काम करून घाम गाळत असतात.मात्र,काही अधिकारी,कर्मचारी शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करीत असल्याचे सदर प्रकारावरून दिसून येत आहे.टेम्पोतून बैलजोडी नेत असतांना तुमचे वाहन जप्त करू कां,वाहन पोलीस ठाण्यात लावा,
असे ते दोघे म्हणतात आणि खोकला लवकर खोकला..त्यावर शेतकरी आम्ही गरीब लोकं आहोत,शेतीसाठी बैलजोडी घेऊन चाललोय,दोनशे रुपये घेऊन टाका..यावर एकजण म्हणतो की,दोनशे रुपयात कां होते..नंतर काही वेळातच दोनशे रुपये घेतो व टेम्पो चालकाशी हुज्जत घालून आपल्या वाहनात बसतो. अडवणूक करणाऱ्यांच्या वाहनावर अर्बन बँकेच्या वसुली पथकाचा फलक लावलेला दिसून येत आहे.सदर प्रकार नेमका काय आहे,हे त्या दोन कर्मचाऱ्यांना फटके लगावल्यानंतर कळणार असल्याचे बोलले जात आहे.
व्हिडिओ👇
- Advertisement -