Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजशेतकऱ्यांना लिंकिंग विरहित खताचा पुरवठा करा.. - शेतकरी उत्पादक कंपन्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे...

शेतकऱ्यांना लिंकिंग विरहित खताचा पुरवठा करा.. – शेतकरी उत्पादक कंपन्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या नेहमीच शेतकरी हितावह कार्ये करीत असून मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकऱ्यांना वाजवी दरात तसेच लिंकिंग विरहित खताचा पुरवठा कंपन्यांकडून करण्यात येतो आहे. मात्र,चालू वर्षात जिल्हात खत उपलब्ध होण्यास उशीर झाल्याने मोठ्या प्रमाणात खत विक्रीमध्ये लिंकिंग होऊन प्रत्यक्ष शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा सहकारी संस्थांना खतपुरवठा न करता संपूर्ण खत व्यापाऱ्यांच्या माध्यमातून वितरित करण्यात येत आहे.त्यामुळे खत विक्रीमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक लूट होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने, होणारी लूट थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना लिंकिंग विरहित खताचा पुरवठा करण्याकरीता रॅकमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना आरक्षित कोटा देण्यात यावा,अशी मागणी देसाईगंज शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष सुनील पारधी,संचालक कैलास पारधी(मोहटोला) व जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या वतीने गडचिरोली जिल्हाधिकारी अवीश्यांत पंडा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे,जिल्ह्यात खताचा पुरवठा करीत असतांना सहकारी संस्थांसह शेतकरी उत्पादक कंपन्यांना रॅक मध्ये आरक्षित कोटा असणे गरजेचे आहे.जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या आणि हित जोपासणाऱ्या असून शेतीचे उत्पन्नवाढीसाठी नेहमी प्रयत्नशील असतात.त्यामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात खत पुरवठा होणे आवश्यक आहे.अश्यातच व्यापारी वर्गांना संपूर्ण खत पुरवठा करण्यात आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार  असल्याची बाब सुनील पारधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये याकरीता लिंकिंग विरहित खताचा पुरवठा होणे गरजेचे असल्याने उत्पादक कंपन्यांना प्राधान्य देण्यात यावे,असेही त्यांनी सांगितले.सोबतच याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनाही निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.तसेच जिल्ह्याचे गुण नियंत्रक तथा कृषीविकास अधिकारी पाल यांच्याशी सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!