Thursday, August 27, 2026
Homeदेसाईगंजशेतकऱ्यांकडून धान खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी...

शेतकऱ्यांकडून धान खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-खरिपातील धान पिकाचा हंगाम धडाक्यात आला आहे.धान पट्ट्यात हलक्या व मध्यम धान पिकाची कापणी व कापलेल्या धान पिकांच्या पेंड्या बांधणे यासह मळणीचे कामांनाही वेग आला आहे.बऱ्याच शेतकऱ्यांनी मळणी करून धान घरी साठवून ठेवली परंतु,अद्यापही शासकीय हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत.केंद्र केव्हा सुरू होणार,याची विचारणा शेतकऱ्यांकडून होतांना दिसत आहे.
महिला मजूर धान कापणी तर,पुरुष मजूर कापणी केलेल्या धान पिकाच्या कडपा गुंडाळणी व मळणी करीत असल्याचे चित्र शेतशिवारात सर्वत्र पहावयास मिळत आहे.हिवाळ्याची सुरुवात झाल्याने हळूहळू थंडीची चाहूल असतानाही मजूर वर्ग आपल्या दैनंदिन दिनचर्येला न चुकता सामोरे जाताना दिसत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यात धान पीक कापणी व मळणीची कामे जोमात सुरू आहेत.
आधुनिक युगात शेतकरी जलद गतीने कामे करण्यासाठी सरसावला आहे.आधुनिकीकरणामुळे मशीनच्या साहायाने धान पीक कापणी व मळणी केली जात आहे.धान पिकाची कापणी झाल्यानंतर शेतातील बांध्यात कापून ठेवलेल्या धान पिकाच्या कडपा सुकल्यानंतर त्यांची बांधणी करावी लागते. यासाठी कमीतकमी चार-पाच दिवसांचा कालावधी लागतो.बांधणी केलेल्या धानाच्या कडपा मळणीसाठी एकत्रितपणे करून धान पिकाचे पुंजणे तयार केले जाते.सध्या स्थितीत कापणी,बांधणी व मळणीच्या कामात शेतकरी व मजूर व्यस्त आहेत.ग्रामीण भागात आधुनिक काळात सुद्धा अजूनही काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने धान कापणी करीत आहेत.महिला मजूर दिवसा कडक उन्हातही भात कापणीच्या कामात व्यस्त आहेत.हुंडा पद्धतीत ३००० रुपये प्रतिएकर तर, मजुरी २५० ते ३०० रुपये ठरलेली आहे.महिला व पुरुष मजुरांच्या हाताला काम मिळत असल्याने,मजूर वर्गात उत्साहाचे वातावरण दिसत आहे.मात्र,अद्यापही शासकीय हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू झालेले नसल्याने नाईलाजास्तव खासगी व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांना धान विकावे लागत आहे.त्यामुळे धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करण्यात यावी; अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!